corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:23 PM2020-04-02T17:23:06+5:302020-04-02T19:20:10+5:30

मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे.

Lockdown Time on Buffalo Stables in Mumbai | corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोना इफेक्ट

यशवंत गव्हाणे।

कोल्हापूर : सकस आणि ताज्या दुधाच्या मागणीमुळे मुंबईसह उपनगरात शेकडो म्हशींचे तबेले वर्षांनुवर्षे सुरू आहेत. तबेल्यातून थेट ग्राहकांपर्यंत दूध अशी त्यांची नाळ आहे; परंतु आता याच भय्यांवर तबेलाच लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण एकच कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेले लॉकडाऊन. याचा परिणाम चारा, खुराकामध्ये पाच ते सात रुपये कृत्रिम भाव वाढ झाली आहे, तर दूध दर मात्र २० रुपयाने उतरुन ४० रु.लिटरवर आल्याने तबेलेवाले भय्या अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

मुंबईतील जोगीश्वेरी, भिवंडी, कल्याण या भागात अनेक जातिवंत जाफराबादी म्हशींचे तबेले आहेत. येथील म्हशीला लागणारा चारा गुजरातसह राज्यातील नाशिक , पुणे, बीड, अमरावती, अहमदनगर, जळगाव, सोलापूर आदी ठिकाणांहून पुरविला जातो; परंतु वाहतूकव्यवस्था बंद असल्याने ट्रकमालक रिटर्न भाडे नसल्याने दुहेरी भाडे तबेल्यावाल्यांकडून घेत आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी गवताच्या पेंडींचा ट्रक वीस हजाराला मिळत असे, त्याला तब्बल ४० ते ४५ हजार रुपय मोजावे लागत आहेत.
मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे.


ऐन हंगामात नुकसान
उन्हाळ्याचा कडाका वाढला की बाजारात दूध, दही, ताक , लस्सी, बासुंदी, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असते. याचा काळात आइस्क्रीम व्यवसायकांची दुधाला भरपूर मागणी असते. त्यामुळे एप्रिल ते मे पर्यंत दुधाचा दर ७० लिटरपर्यंत जात असतो, पण सध्या बाजारच बंद असल्याने आणि लोक गावी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.


चारा लॉकडाऊनपूर्वीचा दर सध्याचा दर
कडबाकुट्टी ९ ते १० रुपये किलो १५ ते १६ रुपये किलो
भाताचा पेंडी ३ ते ४ रुपये किलो ७ ते ८ रुपये किलो


घसरता दुधाचा दर

  • १५ मार्च - ६० ते ६५ रुपये लिटर
  • २० मार्च - ५० ते ५५ रुपये लिटर
  • २५ मार्च - ५० ते ४५ रुपये लिटर
  • ३० मार्च - ४३ ते ४० रुपये लिटर


खुराक लॉकडाऊनपूर्वीचा सध्याचा दर
दर दर

  • सरकी पेंड नं. १ २१ रु .किलो २८ रु .किलो
  • सरकी पेंड नं. १ १९ रु .किलो २५ ते २६ रु .किलो
  • मका १९ रु .किलो २५ रु .किलो
  • काळणा २४ रु .किलो २९ रु .किलो
  • साधी तांब २१ रु .किलो २५ रु .किलो

 

पशुखाद्याच्या दरात कृत्रिम झालेली वाढ आणि लॉकडाऊनमुळे दुधाचे घसरलेले दर याचा फटका तबेला मालकास बसत आहे.सध्या टोल बंद असून डिझेलचे भावही कमी असून शेतीमालाचाही तुटवडा नाही. त्यामुळे पशुखाद्यांच्या वाढलेल्या कृत्रिम दरावर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- शामनाथ कदम, तबेला मालक , भिवंडी.

Web Title: Lockdown Time on Buffalo Stables in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.