लसीकरणाचेच लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:38+5:302021-04-11T04:22:38+5:30

कोल्हापूर : लस संपल्याने गेले दोन दिवस लसीकरणाचेच लाॅकडाऊन झाल्याचे चित्र कोल्हापुरात पाहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रांवर फेऱ्या ...

Lockdown of vaccination | लसीकरणाचेच लॉकडाऊन

लसीकरणाचेच लॉकडाऊन

Next

कोल्हापूर : लस संपल्याने गेले दोन दिवस लसीकरणाचेच लाॅकडाऊन झाल्याचे चित्र कोल्हापुरात पाहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागल्या. आता पुन्हा लस आली असली, तरी ती पुरेशी नाही. दोन दिवस पुरेल एवढीच ही लस आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, नंतर महसूल, पोलीस, पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झाले. याचदरम्यान ४५ वर्षांवरील परंतु व्याधीग्रस्त नागरिकांना, तर ६० वर्षांवरील नागरिकांना सरसकट लसीकरण सुरू झाले. पहिल्या पंधरा दिवसांत लसीकरणाला फार प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने प्रबोधन केल्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला.

अशातच केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय घेतल्याने यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. पंधरा दिवसांपूर्वी असाच एकदा लसीचा तुटवडा भासला होता. परंतु त्यावेळी लसीकरणाचा वेग एवढा नव्हता. तेव्हा दिवसाला सरासरी १५ हजारजण लस घेत होते. परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रतिदिन लस घेणाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेल्यानंतर लस संपल्याने अनेक ठिकाणी लस नसल्याचे फलक लावावे लागले. त्यामुळे गुरुवारी ५० हून अधिक केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले; तर शुक्रवारी १९८ केंदांवरील लसीकरण बंद ठेवावे लागले.

याचदरम्यान लाकडाऊन सुरू झाले. परंतु त्याचा कोणताही अडथळा नागरिकांना झाला नाही. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना कोठेही कुणीही अडवणूक केली नाही. परंतु लसच संपल्याने दोन दिवस नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली.

चौकट

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे २३६

आरोग्य कर्मचारी लसीकरण

पहिला डोस ३७ हजार ७८०

दुसरा डोस १६ हजार ९१८

फ्रंटलाईन वर्कर्स लसीकरण

पहिला डोस ३५ हजार ९३४

दुसरा डोस९ हजार ९०४

४५ वर्षांवरील नागरिक लसीकरण

पहिला डोस१ लाख ६३ हजार ६६८

दुसरा डोस १३७५

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक लसीकरण

पहिला डोस२ लाख ७७ हजार ५९२

दुसरा डोस ३७४०

एकूण लसीकरण

पहिला डोस ५ लाख १५ हजार ०७४

दुसरा डोस ३१ हजार ९३७

कोट

लसीचे १ लाख डोस शनिवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नंतर लागणाऱ्या डोसची मागणी नोंदविण्यात आली आहे.

डॉ. फारूक देसाई,

लसीकरण समन्वय अधिकारी

Web Title: Lockdown of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.