‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:36+5:302021-04-15T04:22:36+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील ६५ ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील ६५ हजारांहून अधिक नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचा लाभ होणार आहे.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही योजना जाहीर करण्यात आली होती. तिचा मोठा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना हाेत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात ३७ केंद्रे मंजूर आहेत. मात्र शिरोळ तालुक्यातील एक केंद्र बंद आहे. त्यामुळे ३६ केंद्रांवर रोज चार हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील या केंद्रांवरून रोज दुपारी ५० पासून २०० पर्यंत नागरिकांना ही थाळी पुरविली जाते. याआधी नागरिक डबे घेऊन येत होते. आता अनेक केंद्रातूनच पार्सल दिले जाते. लाभार्थ्याकडून पाच रुपये घेतले जातात. महाराष्ट्र शासन शहरी भागासाठी एका थाळीला ४५ रुपये; तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देते.
चौकट
‘शिवभोजन’मध्ये हे दिले जाते...
३० ग्रॅमच्या दोन चपात्या
१०० ग्रॅम १ वाटी भाजी
१०० ग्रॅम १ वाटी वरण
१५० ग्रॅम १ मूद भात
चौकटी
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे
३७
बंद १
दररोज कितीजण घेतात लाभ
४०००
अनुदान पद्धत
१ शहरी भागात शिवभोजन केंद्र चालविणाऱ्यास ४५ रुपये अनुदान शासन देते. लाभार्थ्याकडून पाच रुपये आकारण्यात येतात. अशी ही ५० रुपयांना थाळी दिली जाते.
२. ग्रामीण भागात शिवभोजन केंद्र चालविणाऱ्यास ३५ रुपये अनुदान शासन देते. लाभार्थ्यांकडून पाच रुपये आकारण्यात येतात. अशी ही ४० रुपयांना थाळी दिली जाते.
कोट
मी आझाद चौकातच राहते. लॉकडाऊनमुळे कामाची अडचण झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून याच ठिकाणी शिवभोजन थाळी घेते. ही सोय फक्त दुपारी आहे. रात्रीही ही थाळी सुरू करावी, अशी मागणी आहे. येथील जेवण चांगले आहे.
आझाद चौकातील ज्येष्ठ महिला
कोट
मी उद्यमनगरमध्ये कामगार आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी सुरू झाल्यापासून मी रोज दुपारी या योजनेचा लाभ घेत आहे.
यादवनगरातील नागरिक
कोट
मी काही घरांमध्ये धुणीभांडी करते. मी एकटीच आहे. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा येथून शिवभोजन थाळीचे जेवण घेते.
राजेंद्रनगर परिसर
१४०४२०२१ कोल शिवभोजन ०१
कोल्हापूर येथील उमा टॉकीज परिसरातील हे शिवभोजन केंद्र.
छाया : समीर देशपांडे