जिल्ह्यातील ८८७ मद्यालयांना कुलूप

By admin | Published: April 2, 2017 12:38 AM2017-04-02T00:38:08+5:302017-04-02T00:38:08+5:30

व्यावसायिकांचे धाबे दणाणले : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

Locks up to 887 alcohols in the district | जिल्ह्यातील ८८७ मद्यालयांना कुलूप

जिल्ह्यातील ८८७ मद्यालयांना कुलूप

Next

कोल्हापूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असणारी मद्यालये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसाार शनिवारपासून बंद करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे १३५५ पैकी ८८७ मद्यालये भरारी पथकाने सीलबंद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सुमारे २० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत कोल्हापूर शहरातील २१० पैकी सुमारे १६१ मद्यालये बंद करण्यात आली. दिवसभर वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, देशी दारू दुकानांच्या सीलबंदच्या कारवाईनंतर सायंकाळी डॉ. सैनी यांनी भरारी पथकाची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघातांचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी महामार्गांलगत ५०० मीटर अंतरापर्यंतची असणारी सर्व मद्यालये बंद करण्याचा आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात आली. तत्पूर्वी, शुक्रवारीच (दि. ३१) या सर्व मद्यालयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटिसा बजावल्या होत्या.
शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक संजय पाटील, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, महसूल खात्याचे अधिकारी (तहसीलदार), महानगरपालिका, शहर नगररचना विभाग यांच्या सहा भरारी पथकांनी सकाळपासून कारवाई सुरू केली. या कारवाईत यामुळे वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, देशी दारू या व्यावसायिकांचे धाबे दणाणले.
दिवसभर विविध पथकांनी सीलबंदची कारवाई केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या पथकांच्या बैठका घेऊन कारवाईचा आढावा घेतला. या पथकांतर्फे पुणे-बंगलोर महामार्ग, कोल्हापूर-सांगली मार्ग, कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर (संभाजीनगर बसस्थानक) ते गारगोटी मार्गावर, ताराराणी चौक ते रंकाळा तलाव, जुना पुणे-बंगलोर महामार्ग (संगम चित्रमंदिर मार्ग) या मार्गावर ही मद्यालये सीलबंदची कारवाई करण्यात आली.
वॉईन्स मर्चंट्सची भेट नाकारली
या कारवाईला सहा महिने मुदतवाढ द्यावी, यासाठी कोल्हापूर वाईन मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते; पण जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी त्यांना भेट नाकारली.


कारवाईत या प्रमुख मद्यालयांचा समावेश
हॉटेल सयाजी, ओपल, पर्ल, टुरिस्ट, इंटरनॅशनल, प्रार्थना, अयोध्या, रायसन, सनरेज, गिरीश, सुब्राया, ग्रीनलँड, रजत, सनस्टार, वामन, इंद्रप्रस्थ, कोहिनूर, पंचशील, आॅट्रिया, (सर्व स्टेशन रोड); वृषाली (ताराबाई पार्क), प्रसाद (शाहूपुरी), शेतकरी (फुलेवाडी), पॅव्हिलियन (नागाळा पार्क), रसिका गार्डन (मार्केट यार्ड), पूजा (व्हीनस कॉर्नर), साईदर्शन (मार्केट यार्ड), गोल्ड स्टार (भाऊसिंगजी रोड), मधू (शिवाजी चौक), रणजित डिलक्स (जोतिबा रोड), रविराज (मिरजकर तिकटी), सोनल (रंकाळा वेश), इंदिरासागर, (संभाजीनगर), रॉयलरूफ, उजाला (साने गुरुजी वसाहत), प्रतीक (संभाजीनगर), वनराई (आपटेनगर), क्लासिक (रंकाळा वेश), न्यू सीमा (लक्ष्मीपुरी).


चार कोटींचा महसूल जमा
कारवाई झालेल्या मद्यालये मालकांनी ३१ मार्च वर्षअखेरपर्यंत पुढील वर्षाच्या नूतनीकरणासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला होता, पण अचानक ही सीलबंदची कारवाई करण्यात आली. पण हा जमा केलेला महसूल त्या-त्या मद्यालये मालकांना परत देण्याचा विचार करण्यात येत आहे.


२० कोटींचा महसूल बुडाला
या बंद केलेल्या सुमारे ८८७ मद्यालयांकडून प्रतिवर्षी सुमारे २० कोटींचा एकूण महसूल शासनाकडे जमा होत होता. या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला याचा फटका बसणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून जी मद्यालये बंद करण्यात आली आहेत, त्यांना मागणीनुसार स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थलांतरित शुल्क द्यावे लागणार नाही.
- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

शहरातील २१० पैकी १६१ बंद
कोल्हापूर शहरात परमिट रूम, वॉईन्स शॉप, देशी दारू दुकाने, बीअर शॉपी अशी एकूण २१० मद्यालये आहेत; पण न्यायालयाच्या नियमानुसार महामार्गांच्या ५०० मीटर अंतरामध्ये सुमारे १६१ मद्यालये येत असल्याने ती सीलबंद करण्यात आली.

जिल्ह्यातील बंद झालेली मद्यालये
अ.क्र.कार्यक्षेत्रअनुज्ञप्तीचा प्रकार एकूण
देशी वाईनपरमिटबीअर
दारूशॉपशॉपी
१हातकणंगले तालुका२६६११०३३१७५
२कागल तालुका२४२५९२०१०५
३कोल्हापूर शहर२७१७८८२९१६१
४शाहूवाडी तालुका४६२८३१०३२३४
५गडहिंग्लज तालुका२७३७३२५१२८
६इचलकरंजी शहर१६२५९७८४
एकूण१६६३२४७२२१७८८७

Web Title: Locks up to 887 alcohols in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.