तारदाळ येथे रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By Admin | Published: December 26, 2014 12:42 AM2014-12-26T00:42:54+5:302014-12-26T00:44:28+5:30

तरुण औरंगाबादचा : तरुणी जळगाव जिल्ह्यातील

Lojdev's suicide under train at Tadal | तारदाळ येथे रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या

तारदाळ येथे रेल्वेखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या

googlenewsNext

हातकणंगले : प्रेमविवाह करण्यास कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तारदाळ गावच्या हद्दीत आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडली. गोकुळ सतीश देवरे (वय २१, सध्या रा. गणेशनगर, इचलकरंजी, मूळ गाव बनोटी, ता सोयगाव, जि औरंगाबाद) व उषा विनोद चौधरी (२०, जामनेर, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी : उषा व गोकुळ या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना होती. मात्र या विवाहाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे उषाच्या घरच्या लोकांनी दुसऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले होते. उषाला तीन वर्षांची मुलगीही असल्याचे समजते. गोकुळ देवरे हा तारदाळ येथील एका फौंड्रीमध्ये काम करत होता. हे दोघे प्रेमीयुगुल कालपासून बेपत्ता होते. याबाबतची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी केली आहे. नातेवाइकांच्या विरोधाला कंटाळून या दोघांनी आज दुपारी साडेचारच्या सुमारास कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेसखाली तारदाळ रेल्वे फाटकाशेजारी स्वत:ला झोकून दिले. रेल्वेच्या भीषण धडकेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. (वार्ताहर)
हद्दीच्या वादात मृतदेह पडून
या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले.
मात्र अपघाताचे ठिकाण नव्याने झालेल्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत की हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निश्चित न झाल्याने बराचवेळ मृतदेह घटनास्थळी
पडून होते.
मृतांचे नातेवाईक येण्यास उशीर लागणार असल्याने दोन्हीही मृतदेह इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
मात्र या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत हातकणंगले, शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत झाली नसल्याचे समजते.

Web Title: Lojdev's suicide under train at Tadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.