Lok Sabha Election 2019 : भगव्या टोप्या, पंचरंगी झेंडे, मंडलिकांचा अर्ज भरताना मान्यवरांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:37 PM2019-04-01T16:37:19+5:302019-04-01T16:41:15+5:30

हलगीचा कडकडाट, उपस्थितांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, शिवसेनेच्या भगव्यासह लहरणारे भाजप, आरपीआय, रासपचे पंचरंगी झेंडे आणि मान्यवरांची उपस्थिती अशा जल्लोषी वातावरणामध्ये शिवसेना भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला.

Lok Sabha Election 2019: Attendance of the attendees while filling up the applications of saffron hats, Panchangi flags, mandlika | Lok Sabha Election 2019 : भगव्या टोप्या, पंचरंगी झेंडे, मंडलिकांचा अर्ज भरताना मान्यवरांची उपस्थिती

अर्ज दाखल करण्यापूर्वी उपस्थित नेत्यांनी प्रसिध्दीमाध्यमांसाठी अशी पोझ दिली. यावेळी डावीकडून उत्तम कांबळे, हिंदूराव शेळके, बाबा देसाई, अशोक देसाई, महेश जाधव, राजेश क्षीरसागर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रा. संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, विजयसिंह मोरे, प्रकाश आबिटकर, संजय पवार उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देभगव्या टोप्या, पंचरंगी झेंडेमंडलिकांचा अर्ज भरताना मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, उपस्थितांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, शिवसेनेच्या भगव्यासह लहरणारे भाजप, आरपीआय, रासपचे पंचरंगी झेंडे आणि मान्यवरांची उपस्थिती अशा जल्लोषी वातावरणामध्ये शिवसेना भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला.

अर्ज दाखल करण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी तालुक्यातून आणि शहरातून निवडक कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे सकाळी १0 पासूनच जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलवर गर्दी दिसत होती. हॉलमध्ये एकीकडे भगव्या टोप्या आणि शिवसेनेच्या मफलरचे वितरण सुरू होते.

अशातच एक एक नेते येण्यास सुरूवात झाली. साडे दहाच्या सुमारास संजय मंडलिक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी गर्दी उडाली. सव्वा अकरानंतर जयलक्ष्मीमधून सर्वजण बाहेर पडले. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणा देत नेते कार्यकर्ते वातावरण तयार करत होते.

जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, आमदार सुरेश हाळवणकर,चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुरेश साळोखे, राजेश पाटील, अंबरिश घाटगे, विजयसिंह मोरे, बाबुराव देसाई, चंद्रकांत जाधव, विजय सुर्यवंशी, राजेखान जमादार, आरपीआय आठवले गटाचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे,वैशाली मंडलिक, शिवानी भोसले, दीपाली घाटगे, शुभांगी पोवार, यांच्यासह सर्व कार्यकर्ते बाहेर पडताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील रॅलीत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

यानंतर १00 मीटरच्या अंतरावर आल्यानंतर पालकमंत्री पाटील, सर्व आमदार आणि निवडकांना आत सोडण्यात आले. त्यानंतर मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अर्ज भरला. पाऊण तासानंतर अर्ज दाखल करून आल्यानंतर महावीर उद्यानामध्ये थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मंडलिक यांनी आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी दिल्या घोषणा

रॅलीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना मध्येच सर्व नेत्यांनी एकत्रित फोटोसाठी पोझ दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘शिवसेना भाजप आरपीआय रासप, शिवसंग्राम युतीचा’ अशी घोषणा दिल्या.

पालकमंत्री तातडीने रवाना

केवळ अर्ज दाखल करण्याच्या रॅलीसाठी आलेले मंत्री पाटील हे दोन मिनीट चालले आणि त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी इतरांना पुढे पाठवून ते कराडकडे रवाना झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने इंदापूरला जाणार होते.

चंद्रकांत पाटील यांचा चरणस्पर्श

रॅलीमध्ये चंद्रकांत पाटील आल्याआल्या प्रा. संजय मंडलिक यांनी त्याच गर्दीत वाकून पाटील यांना नमस्कार केला. पाटील यांना युतीचे मफलर घालण्यात आले आणि रॅली पुढे निघाली.

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षांचे पतीही उपस्थित

या निवडणुकीत पै पाहुण्यांचे राजकारणही जोरात असल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संचालिका संगीता खाडे या राष्ट्रवादीच्या महिला ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा आहेत. मात्र त्यांचे आणि मंडलिक यांचे नाते आहे.त्यामुळे त्यांचे पती मंडलिक यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

कॉंग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी कार्यकर्तेही उपस्थित

या रॅलीवेळी कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांचे कार्यकर्ते तर होतेच. त्याचबरोबर गडहिंग्लज जनता दलाचेही निवडक कार्यकर्ते आले होते.श्रीपतराव श्ािंदे यांनी अजून भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आमचे नाव घालू नका असेही त्यातील एकजण सांगून गेला. राष्ट्रवादीचेही काही कार्यकर्ते दिसून येत होते.

हळदकर यांचा अनोखा प्रचार

कागल तालुक्यातील चिमगावचे साताप्पा हळदकर हे मंडलिक यांचे कट्टर समर्थक. त्यांनी आपल्या हॅटवर लाकडी धनुष्यबाण चिन्ह तयार करून लावले होते. त्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

महाडिक येणार असल्याने पोलिसांची धावपळ

दुपारी १ नंतर धनंजय महाडिक हे अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने त्याआधी हे सर्व कार्यकर्ते येथून हलावेत यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरू होती.

कॅमेरा आणल्यानंतर कार्यकर्ते हलले

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानाच्या कडेला कार्यकर्ते होते. ते पोलिसांनी सांगूनही तेथून हलेनात. अखेर निवडणूक विभागाच्या प्रतिनिधींनी कॅमेराव्दारे चित्रीकरण सुरू केल्यानंतर कार्यकर्ते पाठीमागे जावून बसले.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Attendance of the attendees while filling up the applications of saffron hats, Panchangi flags, mandlika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.