Lok Sabha Election 2019 : भाजप-सेना युतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले ; करवीरनगरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 08:17 PM2019-03-24T20:17:25+5:302019-03-24T20:28:31+5:30
भाजप-शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी फुंकले. सभेद्वारे युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी फुंकले. सभेद्वारे युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
अथांग जनसागर!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 24, 2019
भाजपा-शिवसेना-रिपाईच्या संयुक्त प्रचाराचा कोल्हापुरातून शुभारंभ: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे आदी प्रामुख्याने उपस्थित.
येथील तपोवन मैदानावर सायंकाळी सहाच्या सुमारास सभेची सुरुवात झाली. या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास, पशुपालनमंत्री महादेव जानकर, यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे लोकसभा उमेदवार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून, भगवे ध्वज घेऊन भाजप, सेनेचे कार्यकर्ते या सभेसाठी आले होते.
महायुतीची भव्य प्रचार सभा कोल्हापूर#महायुती@Dev_Fadnavis@raosahebdanve@ChDadaPatil @ShivSenahttps://t.co/XU6TeGnGsP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 24, 2019
पाच हजार शिवसैनिकांची रॅली
यानिमित्ताने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार शिवसैनिकांची भगवी रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे शहरातून तपोवन मैदानाकडे शिवसैनिक आले.
परंपरा जपली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेनुसार लोकसभा प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून व्हावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आणि फडणवीस यांनी ती मान्य केली. त्यानुसार सभा झाली.