Lok Sabha Election 2019 बेळगावात दुरंगी; मतदारांत निरूत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:36 AM2019-04-20T00:36:27+5:302019-04-20T00:36:41+5:30

प्रकाश बेळगोजी । लोकमत न्यूज नेटवर्क बेळगाव : कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठी मतदानाची पहिली फेरी संपली असून २३ ...

Lok Sabha Election 2019 Blues in the voters | Lok Sabha Election 2019 बेळगावात दुरंगी; मतदारांत निरूत्साह

Lok Sabha Election 2019 बेळगावात दुरंगी; मतदारांत निरूत्साह

Next

प्रकाश बेळगोजी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठी मतदानाची पहिली फेरी संपली असून २३ एप्रिलला होणाऱ्या दुसºया टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व चिक्कोडी या दोन मतदारसंघांत मतदान केवळ चार दिवसांवर येऊन ठेपले असताना जनतेमध्ये निरूत्साहाचे वातावरण आहे.
भाजपचे बेळगावचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी हे चौथ्यावेळी रिंगणात असून त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे पाठबळ नसल्याने बेळगाव शहरात प्रचार सभा, फेºया घेणे टाळले आहे. स्वपक्षातील कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध असल्याने शहरातील अनेक मोठ्या गल्ल्यांतून त्यांच्याबद्दलच्या नाराजीचा सुरू दिसून येतो. अंगडी यांनी आतापर्यंत आमचा उपयोग करून घेतला आहे, असा आरोप अनेक तरुण कार्यकर्ते करताना दिसतात. केवळ आपला उपयोगच निवडणुकीपुरतीच करून घेतात नंतर आमच्यावर संकट आल्यानंतर मात्र पाठ फिरवतात. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या सामोरे जाणे टाळले आहे.
जनाधार मिळवण्यासाठी सुरेश अंगडी यांचा खटाटोप सुरू असून त्यांनी यासाठी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेतला आहे. अंगडी यांचे समर्थक ‘मोदी जरूरी अन अंगडी मजबुरी’ असा नारा देत आहेत. मात्र, आश्चर्य म्हणजे सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुरेश अंगडी यांच्यामागे जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेता त्यांच्या प्रचारासाठी पुढे येताना दिसत नाही. इतकेच काय तर आरएसएसच्या अंतर्गत विरोध असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे मोदी यांची सभा बेळगावऐवजी चिक्कोडीला घेण्यात जिल्ह्यातील बड्या नेत्यांचं राजकारण आहे, अशीदेखील चर्चा आहे तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभादेखील योगी यांच्यावरील बंदीमुळे होऊ शकली नाही त्यामुळे ते नाराज आहेत. अंगडी यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांची जाहिरातबाजी करून त्यांनी श्रेय मिळवण्याचा खटाटोप केला होता. त्याचीदेखील कुणी फारशी दखल घेतली नाही.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने ४५ उमेदवार आहेत हे उमेदवार देखील बºयापैकी मते खाणार असून त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची चिंता वाढली आहे. समितीच्या उमेदवारांनी प्रचारफेरीत आघाडी घेतली नसली तरी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. काँग्रेसच्यावतीने बेळगाव मतदारसंघात डॉ. व्ही. एस. साधूनावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते मूळचे बैलहोंगलचे असून के. एल. ई संस्थेचे संचालक आहेत.
पंचमसाली लिंगायत समाजातील एक मोठा चेहरा आहेत मात्र बेळगाव भागात त्यांची ओळख नाही. तो नवीन चेहरा असल्याने त्यांची भिस्त बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग भागावर आहे. बेळगाव भागात काँग्रेस पिछाडीवर असण्याचे मुख्य कारण म्हणजे बेळगाव भागात संपर्क अभाव आहे लोकांत ते परिचित नाही. एकूणच बेळगावची निवडणूक दुरंगी होत असून कोण बाजी मारतंय पाहावे लागेल.

Web Title: Lok Sabha Election 2019 Blues in the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.