Lok Sabha Election 2019 ‘ठंडा ठंडा कुल कुल, विरोधक होणार गुल’-मिरजकर तिकटी परिसरात ‘लस्सी पे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:48 PM2019-04-08T17:48:52+5:302019-04-08T17:50:03+5:30
मिसळ, कटवड्यानंतर आता उन्हाच्या तडाख्यात कोल्हापूरमध्ये ‘लस्सी पे चर्चा’ रंगली. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी
कोल्हापूर : मिसळ, कटवड्यानंतर आता उन्हाच्या तडाख्यात कोल्हापूरमध्ये ‘लस्सी पे चर्चा’ रंगली. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी मिरजकर तिकटी परिसरात ‘ठंडा ठंडा कुल, विरोधक झाले गुल’ म्हणत चर्चा केली.
युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शाहूपुरी परिसरातील फेरी पार पडल्यानंतर मिरजकर तिकटी येथे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी ‘लस्सी पे चर्चा’मध्ये शहरातील प्रचाराची रणनीती ठरविली. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये मंगळवार पेठेतील जनता, तालीम संस्था मंडळे यांनी सहभागी व्हावे. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, मंडलिक यांच्या विजयाची गुढी ही युतीच्या लस्सीमुळेच उभारणार असून, विरोधक थंडगार होणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पोवार, आर. डी. पाटील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्तसंघटनेचे अध्यक्ष अच्युत साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक राहुल चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारूगले, राजू पाटील, विशाल देवकुळे, अमर समर्थ, दीपक गौड, गजानन भुर्के, दत्तात्रय माने, मदन चोडणकर, बाबासाहेब लबेकरी, दिनेश साळोखे, श्रीकांत मंडलिक, संजय म्हेतर, रूपेश रोडे, रामनाथ पोवार, खंडेराव जाधव, संदीप साळोखे, नरेंद्र जाधव, युवराज खाडे, नंदू भोपळे, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात सोमवारी मिरजकर तिकटी परिसरामध्ये शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लस्सी पे चर्चा करत शहरातील प्रचाराची रणनीती ठरविली. या चर्चेत आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अमर समर्थ, आदी सहभागी झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)