Lok Sabha Election 2019 नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:52 PM2019-04-12T13:52:48+5:302019-04-12T17:05:22+5:30
दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय असते महिला मेळाव्या आडून स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे अशी बोचरी टीका खासदार धनंजय महाडिक
कळंबा : दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडी बायकोला प्रिय असते महिला मेळाव्या आडून स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे अशी बोचरी टीका खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली कळंबा येथील महालक्ष्मी तालीम मंडळ येथे लोकसभा निवडणुकीचे युतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांच्या प्रचारा निमित्त आयोजित कार्यकर्ते संपर्क मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्ष स्थानी भाजप संघटनमंत्री बाबा देसाई होते
आम्ही युतीच्या काळात केलेली विकासकामे मीच केली असा खोटा धिंडोरा पिटणारे खासदार महाडीक स्वतः एक काम करणार आणि शंभर कामे मीच केली असे सांगणार हे म्हणजे खोटं बोल खरं रेटून बोल असा प्रकार आहे खासदार निधी व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्वच विकासकामे युती शासनाच्या निधीमधून झाली आहेत याचे श्रेय कोणी लाटू नये विविध शासकीय योजना राबवत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले रेल्वे, विमानतळ आदी प्रश्न आम्ही मार्गी लावले त्यामुळेच महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोचवून त्यांना निवडून बहु मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
कारेक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण शिवाजी जाधव , विराज पाटील, रणजित कोंडेकर,भाजपचे अशोक देसाई, सुभाष रामुगडे, राहुल चिकोडे, बाजीराव पोवार, प्रकाश कदम, कळंबा ग्रा प सदस्य विजय खानविलकर, रोहित मिरजे, अरुण टोपकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते
आघाडीत बिघाडी
लोकसभा निवडणुकीत पूर्वी आघाडीत बिघाडी होतअसून पंतप्रधान कोण होणार शरद पवार की राहुल गांधी की अन्य या नावावर एकमेकांत जुंपली आहे पण मोदी हेच देशास विकास करू शकणार असल्याने पुन्हा भाजप अर्थात मोदी सरकार निवडून येणार असल्याचेमत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले