Lok Sabha Election 2019 लोकशाही धोक्यात असल्याने आघाडीसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:07 AM2019-04-11T01:07:59+5:302019-04-11T01:08:19+5:30

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून ...

Lok Sabha Election 2019 Democracy is in danger because of the alliance with the alliance | Lok Sabha Election 2019 लोकशाही धोक्यात असल्याने आघाडीसोबत

Lok Sabha Election 2019 लोकशाही धोक्यात असल्याने आघाडीसोबत

Next

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून भाजपतील नेतेमंडळी माझ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. माझी चळवळ वंचित, दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी आहे. संविधान व लोकशाही धोक्यात असल्यामुळे मी महाआघाडीसोबत आहे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
हातकणंगले येथील नेहरू चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी सहकाऱ्यांसह राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला.
खा. शेट्टी यांनी मोदी सरकारने कर्जमुक्ती, शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव यासह सर्वच शेतकºयांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे सर्व शेतकरी संघटना एकत्र करून आवाज उठवला म्हणून दिल्लीवरून आदेश आल्यामुळे भाजप नेते बिथरले आहेत. ते माझ्या चुका आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, ५६ पक्षांची आमची महाआघाडी माझ्या भक्कम पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.
प्रमोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये प्रथम राजू शेट्टी यांनी आवाज उठवला. शरद पवारांनंतर खासदार शेट्टी यांनीच शेतकºयांसाठी लढा उभा केला. शेतकरी जगला तर देश आहे. शेतकरी चळवळीचा नेता म्हणून आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे राजू आवळे, हातकणंगलेचे माजी सरपंच अजित पाटील, गुंडा इंरकर, रोहीत मलमे, हातकणंगले तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव आदींनी मत व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राहुल आवाडे, संदीप कारंडे, अरुण जानेवकर, दीपक वाडकर, सुदेश मोरे, राजेश पाटील, जयकुमार कोले, बाळगोंडा पाटील, बाबासाहेब चौगुले, मिश्रीलाल जाजू, अ‍ॅड. सुरेश पाटील, आप्पा ऐडके, अमित पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

भाजप सरकारची केवळ घोषणाबाजी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारविरुद्ध
जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. गोरगरिबांना पाच वर्षे कागदपत्रांसाठी रांगेत उभा केले. त्यामुळे जनता खवळून उठली आहे. हे सरकार घोषणाबाज आहे. थापा मारणारे आहे.
सर्व पातळींवर अपयशी ठरलेले हे सरकार आता जाणार आहे. म्हणून जातीयवादी राजकारण सुरू आहे. मात्र, कष्टकºयांच्या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरणाºया राजू शेट्टींसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी ताकतीने काम करत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये इर्ष्या सुरू आहे ती कोणत्या मतदारसंघात राजू शेट्टींना लिड मिळणार यासाठी.

Web Title: Lok Sabha Election 2019 Democracy is in danger because of the alliance with the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.