Lok Sabha Election 2019 कागल तालुक्यात अद्याप इलेक्शन ज्वर ‘कूल कूल’च-गटागटाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:03 AM2019-04-03T00:03:19+5:302019-04-03T00:04:27+5:30

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात अजून म्हणावा तितका ‘इलेक्शन ज्वर’ कार्यकर्त्यांमध्ये नाही.तालुक्यातील प्रमुख चार गटांपैकी मंडलिक गटाचे प्रमुखच शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा गट यजमानाची, तर अन्य गट पाहुण्यांची

Lok Sabha Election 2019 Election pollution in Kagal taluka still follows 'Cool Cool' -group politics | Lok Sabha Election 2019 कागल तालुक्यात अद्याप इलेक्शन ज्वर ‘कूल कूल’च-गटागटाचे राजकारण

Lok Sabha Election 2019 कागल तालुक्यात अद्याप इलेक्शन ज्वर ‘कूल कूल’च-गटागटाचे राजकारण

Next
ठळक मुद्देराजकीय मंडळींकडून सोयीस्कर भूमिका

जहाँगीर शेख ।
कागल : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात अजून म्हणावा तितका ‘इलेक्शन ज्वर’ कार्यकर्त्यांमध्ये नाही.तालुक्यातील प्रमुख चार गटांपैकी मंडलिक गटाचे प्रमुखच शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा गट यजमानाची, तर अन्य गट पाहुण्यांची भूमिका सध्या बजावत आहेत.

आमदार हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी तालुक्याचा दौरा पूर्ण करीत आणला आहे, तर शिवसेनेचे संजय घाटगे, भाजपचे समरजित घाटगे यांनीही प्रा. मंडलिकांच्या प्रचारासाठी गाववार बैठका, सभा घेणे सुरू केले आहे.‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी उपसभापती भूषण पाटील यांनी खासदार महाडिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर प्रवीणसिंह पाटील मुश्रीफांसोबत असल्याचे जाहीर करून सावधगिरी बाळगत आहेत. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून आमदार मुश्रीफ पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या जुमलेबाजीवर बोलत आहेत, तर समरजित घाटगे आपण विधानसभेसाठी तयार आहोत. मंडलिकांबरोबर मलाही साथ द्या, असे आवाहन करीत आहेत.

संजय घाटगे हे प्रा. मंडलिकांवर स्तुतिसुमने उधळीत असताना अमरीश घाटगे हे धनंजय महाडिक यांच्या संसदरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेतखरेतर लोकसभेसाठी खासदार महाडिक यांना पहिल्यांदा प्रमोट करण्याचे काम विक्रमसिंह घाटगे यांनी केले होते, तर २००४ रोजी प्रा. संजय मंडलिक यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता. गत लोकसभा निवडणुकीत मंडलिकांच्या पाठीशी संजय घाटगे, बाबासाहेब पाटील होते, तर महाडिक यांच्यासोबत मुश्रीफ, राजे, पाटील होते. तालुक्यातील उमेदवार असूनही प्रा. मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. कागल, सांगाव, सिद्धनेर्ली परिसरात तर महाडिक यांना मताधिक्य मिळाले होते. पुढे हे मताधिक्य कमी होत गेले आणि मंडलिकांना दहा हजारांवर मताधिक्य लाभले. नंतर हाच पॅटर्न विधानसभेलाही चालला.

नगरपालिका निवडणुकीत तर राजकीय गुंता झाला. जिल्हा परिषदेची निवडणूक तिरंगी झाली. मंडलिक-संजय घाटगे एकत्र असूनही तिरंगी लढतीचा त्यांना फायदा झाला नाही. उलट मुश्रीफ गटाला ‘अच्छे दिन’ आले. निकालानंतर जिल्हा परिषदेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने अमरीश घाटगे यांना सभापतिपद मिळाले, तर पं. समितीत मुश्रीफ-मंडलिक यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. तालुक्यातील सहकारातही एकमेकांच्या संस्था बिनविरोध करण्याचे धोरण या नेतेमंडळींनी राबविले. जिल्हा बँकेत मुश्रीफ-मंडलिक, तर ‘बिद्री साखर’मध्ये तालुक्यात मुश्रीफ, राजे, पाटील एकत्र आले. गोकुळ मल्टीस्टेटवेळी रणजितसिंह पाटील, संजय घाटगे हे ठरावाच्या बाजूने, तर मुश्रीफ, मंडलिक, प्रवीणसिंह पाटील विरोधात सक्रिय होते. अशा प्रत्येक निवडणुकीत सोयीस्कर भूमिका घेण्याचे काम सर्वच राजकीय मंडळींनी केले आहे. त्यातून गावागावांतील कार्यकर्तेही आपल्या गावचे राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीत बाहेर काढीत आहेत. एकंदरीत ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.


कागल तालुक्यातील राजकीय बलाबल
जि.प. सदस्य- ५ - पं. समिती- १०
मुश्रीफ गट = ३ ५
मंडलिक गट = १ ४
संजय घाटगे = १ १

 

कागल नगरपालिका
मुश्रीफ गट - नगराध्यक्ष, ८ सदस्य
मंडलिक गट - २, राष्ट्रवादी
पुरस्कृत अपक्ष - १
राजे गट - ९ सदस्य

 

मुरगूड नगरपालिका
मंडलिक गट- नगराध्यक्ष, १४ सदस्य
मुश्रीफ गट - २, प्रवीणसिंह पाटील-१
साखर कारखाने.
छत्रपती शाहू - राजे गट
हमीदवाडा - मंडलिक गट
सरसेनापती - मुश्रीफ गट
अन्नपूर्णा (नियोजित) - संजय घाटगे गट
बिद्री - मुश्रीफ गट - ४, राजे गट - ३ संचालक.


२०१४ लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते. (केवळ कागल तालुका.)

प्रा.संजय मंडलिक : ९१३४२
धनंजय महाडिक : ८०७४०
मताधिक्य : १०६०२

Web Title: Lok Sabha Election 2019 Election pollution in Kagal taluka still follows 'Cool Cool' -group politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.