Lok Sabha Election 2019 : लोकसभेसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:52 AM2019-03-27T11:52:33+5:302019-03-27T11:54:22+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांच्या दालनात या मतदारसंघाची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर हे हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकरिता करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे हे ‘कोल्हापूर’साठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असून, ‘हातकणंगले’साठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी असणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा :
- अर्ज भरणे : २८ मार्च ते ४ एप्रिल'
- छाननी : ५ एप्रिल
- माघारीची मुदत : ८ एप्रिल
- मतदान : २३ एप्रिल
- मतमोजणी : २३ मे