Lok Sabha Election 2019 खासदारांनी प्रश्न मांडले पण सुटले किती? : राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 03:20 PM2019-04-12T15:20:21+5:302019-04-12T15:23:30+5:30
विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते
कोल्हापूर : विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते पण मांडलेल्या प्रश्नातून किती प्रश्नाची सोडवणूक झाली, हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे, असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे लगावला.
शिवसेना,भाजप,‘रिपाइं’(ए),रासप महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक गुजरी परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आ. क्षीरसागर म्हणाले, ठराविक सांस्कृतिक कार्यक्रम, मतदारांना आमिषे आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा अपप्रचार याशिवाय प्रचाराचे मुद्दे विद्यमान खासदारांकडे नाहीत. याउलट शिवसेनेचे उमेदवार मंडलिक यांच्याकडे प्रश्नाची सोडवणूक करण्याची असलेली कसब आहे. तसेच गेल्या साडेचार वर्षात शिवसेना भाजप युतीने उभा केलेला विकास कामांचा डोंगर, सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क, यामुळे कोल्हापुरात भगवाच फडकणार आहे.
उपशहरप्रमुख अमित चव्हाण, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, तुकाराम साळोखे, अरुण सावंत, अजित गायकवाड, अंकुश निपाणीकर, निहाल मुजावर, सागर शिंदे, शाहरुख बागवान, केदार भुर्के, मोहन माजगावकर, युवराज भोसले, अभिजित ओतारी, निखील कालेकर, अवधूत दळवी, विक्रम पवार आदी उपस्थित होते.