Lok Sabha Election 2019 : शिक्षक करणार पथनाट्याद्वारे मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:04 PM2019-03-30T14:04:07+5:302019-03-30T14:04:45+5:30

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण सुरू आहे.

Lok Sabha Election 2019 Teachers Will Make Voters Awareness Through Pathnotes | Lok Sabha Election 2019 : शिक्षक करणार पथनाट्याद्वारे मतदार जागृती

कोल्हापुरातील महापालिका शिक्षण समिती व करवीर पंचायत समिती यांच्यावतीने मतदार जागृती करण्याकरिता शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

Next
ठळक मुद्देशिक्षक करणार पथनाट्याद्वारे मतदार जागृती

कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण सुरू आहे.

ऐतिहासिक बिंदू चौक, भवानी मंडप, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी नियमितपणे पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जागृतीचे काम केले जाणार आहे.

शहरातील गजबज असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्तमंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी करवीर तथा आचारसंहिता प्रमुख सचिन घाटगे, गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी एस. के. यादव, सहायक नोडल अधिकारी डी. एस. तळप, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई व शांताराम सुतार यांच्या उपस्थितीत मतदार जागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

मतदार जागृती पथनाट्याच्या सादरीकरणामध्ये प्राथमिक शाळेकडील प्रभाकर लोखंडे, सरिता सुतार, अजित पाटील, निता खाडे, साताप्पा पाटील, उषा सरदेसाई, संतोषकुमार कदम, दिग्विजय नाईक, आदिती जाधव, विक्रम भोसले, क्षमा खोमणे, जयश्री पुजारी व नामदेव वाघ या शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Teachers Will Make Voters Awareness Through Pathnotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.