Lok Sabha Election 2019 जनसंपर्क नसल्याने विरोधकांकडून आमिष दाखविण्याची वेळ-नीलम गोºहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:56 PM2019-04-19T18:56:30+5:302019-04-19T18:57:32+5:30
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला आहे. याउलट निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याने विरोधी उमेदवारांवर मतदारांना आमिषे दाखवून प्रलोभित करण्याची वेळ आली आहे,
कोल्हापूर : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला आहे. याउलट निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याने विरोधी उमेदवारांवर मतदारांना आमिषे दाखवून प्रलोभित करण्याची वेळ आली आहे, असा टोला शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी शुक्रवारी लगावला. विरोधकांच्या या आमिषांना जनता बळी न पडता प्रा. संजय मंडलिक यांनाच विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्तकेला.
शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ परिसरात आयोजित पदयात्रेप्रसंगी त्या बोलत होत्या. सकाळी प्रचारफेरीची सुरुवात शनिवार पेठ येथील शिवसेना शहर कार्यालय येथून आमदार डॉ. नीलमताई गोºहे, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करत ही प्रचारफेरी पुढे काळाइमाम तालीम, बाजारगेट रोड, बजाप माजगावकर तालीम, जोशी गल्ली कॉर्नर, पिवळावाडा चौक, बुरुड गल्ली, मृत्युंजय तरुण मंडळ, निकम गल्ली, गिरणी कॉर्नर, शिपुगडे तालीम, डांगे गल्ली, तोरस्कर चौक, जुना बुधवार तालीम, भगतसिंग चौक, सोन्या मारुती चौकमार्गे शिवसेना शहर कार्यालय येथे येऊन समाप्त करण्यात आली.
आ. गोºहे म्हणाल्या, राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ परिसरातून शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आमदार कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने निवडून दिला असून, या लोकसभेला संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेचा खासदार निवडून द्यावा.
आमदार क्षीरसागर म्हणाले, निवडणुकीस चार दिवसांचा अवधी शिल्लक असून, शिवसैनिकांनी गाफील न राहता, दक्ष राहावे.
या प्रचारफेरीस माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, श्रीकांत बनछोडे, निशिकांत मेथे, धनंजय सावंत, शशिकांत पाटील, ऋतुराज क्षीरसागर, उदय भोसले, अनिल पाटील, अजित राडे, उमेश जाधव, ओंकार परमणे, सुनील करंबे, संतोष दिंडे, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगल साळोखे, पूजा भोर, शाहीन काझी, महानंदा रेळेकर, पूजा पाटील, पूजा कामते सहभागी होते.
कोल्हापूर मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ, बुधवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली.