Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:00 AM2019-04-19T00:00:45+5:302019-04-19T00:01:02+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ या शहरांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना, तर ‘कागल’ शहराने ...

Lok Sabha Election 2019 For urban voters, the ropes | Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांसाठी रस्सीखेच

Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांसाठी रस्सीखेच

Next

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ या शहरांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना, तर ‘कागल’ शहराने राष्टÑवादीचे धनंजय महाडिक यांना ताकद दिली होती. विशेष म्हणजे मंडलिक यांना दोन्ही शहरांत ३२८३ इतकी मते मिळाली होती; पण महाडिक यांना एकट्या कागल शहराने २६५२ मते दिली होती. आता संदर्भ बदलले असून, दोघांनाही हे बळ कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरासह गडहिंग्लज, कागल ही लहान शहरे येतात.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही शहरांत संजय मंडलिक यांना एक लाख ४० हजार ५९०, तर धनंजय महाडिक यांना एक लाख ३९ हजार ९५९ मते मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही ठिकाणची समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ८१ पैकी ४४ जागा जिंकत दोन्ही कॉँग्रेसने सत्ता स्थापन केली. भाजप व ताराराणी आघाडीने ३३, तर ‘मनसे’ने एका जागेवर विजय संपादन केला. शहरात शिवसेना-भाजपच्या तोडीस तोड दोन्ही कॉँग्रेसची ताकद आहे; पण कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘शिवधनुष्य’ हातात घेतल्याने येथे राष्टÑवादीला ‘ताराराणी’ आघाडीला सोबत घेऊन लढावे लागत आहे; त्यामुळे गेल्या वेळच्या मंडलिक यांच्या १३८५ च्या मताधिक्यात वाढ करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे, तर मंडलिकांचे मताधिक्य कमी करण्यासाठी महाडिक यांनी जोडण्या लावल्या आहेत.
कागल शहरात गेल्या वेळेला महाडिक यांना २६५२ चे मताधिक्य मिळाले होते; त्यावेळी हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे ताकदीने त्यांच्या मागे होते. आता समरजितसिंह घाटगे हे मंडलिक यांच्या बाजूने असल्याने हे मताधिक्य राखणे महाडिक यांच्यासमोर आव्हान आहे. गडहिंग्लज शहरात गेल्या वेळेला मंडलिकांना १८९८ इतके मताधिक्य मिळाले
होते. त्यावेळी जनता दलाचे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे हे मंडलिक यांच्या बाजूने होते. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या राजकारणामुळे या वेळेला येथील समीकरणे बदलली आहेत.
एकंदरीत कोल्हापूर मतदारसंघात तिन्ही शहरांतील मतदारांची भूमिका महत्त्वाची असून, या मतदारांचा कौल मिळविण्यास दोन्ही उमेदवारामध्ये स्पर्धा लागली आहे.

कोणत्या भागात
कोणाचा आहे होल्ड?
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर शहरात शिवसेनेचे मताधिक्य राहिले होते. तर कागलमध्ये राष्टÑवादीने बाजी मारली होती.
कोल्हापूर महापालिकेत कॉँग्रेस, राष्टÑवादी, तर कागलमध्ये राष्टÑवादीची सत्ता आहे. गडहिंग्लज जनता दलाच्या ताब्यात आहे.
शहर संजय मंडलिक धनंजय महाडिक
कोल्हापूर १,२५,८९६ १,२४,५११
गडहिंग्लज ७,३६३ ५,४६५
कागल ७,३३१ ९,९८३
एकूण १,४०,५९० १,३९,९५९

Web Title: Lok Sabha Election 2019 For urban voters, the ropes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.