इनोव्हा गेली, फॉर्च्युनर आली! पुण्यात फ्लॅट घेतला; राजू शेट्टींची संपत्ती कितीने वाढली?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:48 PM2024-04-15T18:48:27+5:302024-04-15T18:51:46+5:30
Raju Shetty : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्ज दाखल केला आहे, यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. यात आता राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांच्या संपत्तीत ४५ लाखांची वाढ झाली आहे, तर ३० लाखांची एक गाडी शेतकऱ्यांनी गिफ्ट दिली आहे. शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात पुण्यात एक फ्लॅट घेतल्याचे सांगितले आहे.
नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले
राजू शेट्टी यांची संपत्ती-
१) रोख शिल्लक- ५० हजार
२)बँक शिल्लक- ९ लाख ८३ हजार २४६
३) गुंतवणूक-स्वाभिमानी दुध संघ व इतर- ७ लाख ३० हजार
४) सहकारी संस्था व कंपनी शेअर्स- १५ लाख ७८ हजार ४२०
५) विमा पॉलिसी- ४१ लाख ३३ हजार ८३
६) वहाने-आजचे मुल्यांकन
अ) इनोव्हा-क्रिस्टा २०१६
ब) क्वॉलिस २००३ शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ४० हजार
क) रेनॉल्ट डस्टर- ४ लाख
ड) फॉर्च्यनर २०२२-शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ३० लाख
इ) यामाहा एफझेडआय ट्यू व्हिलर- ५० हजार
ई) हिरा इलेक्ट्रीक बस- १ लाख २२ हजार ३७३
७) सोने जिन्नस- १० लाख ८५ हजार
८) शेतजमिन मालमत्ता वारसाप्राप्त-आजचे मुल्यांकन- २५ लाख
९) शेतजमिन मालमत्ता-खरेदी केलेली आजचे मुल्यांकण- ४७ लाख
१०) एन.ए प्लॉट-स्वाभिमानी इंडस्ट्रीजमध्ये- ३५ लाख
११) इमारत बांधकाम मालमत्ता -शिरोळ- ७० लाख
१२) पुणे फ्लॅट खरेदी २८-१२-२०२०- ३२ लाख
१३) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अमाानत डिपॉझीट- १ कोटी १९ हजार
कर्ज तपशील-
१)स्टेट बँक ऑफ इंडिया-फॉर्च्युनर गाडी कर्ज- १ लाख ८ हजार १२१
२) स्टेट बँक ऑफ इंडिया- पुणे प्लॅट खरेदी कर्ज- २३ लाख ९५ हजार ४४९
३) आयडीबीआय बँक शाखा जयसिंगपूर- २१ लाख ६ हजार १८६
४) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-पीक कर्ज- ८७ हजार ५००
५) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-क्षारपड जमिन सुधारणा कर्ज - २ लाख ५९ हजार
६) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अनामत डिपॉझीटसाठी कर्ज - १ कोटी
२०१९ साली राजू शेट्टी यांची एकूण मालमत्ता २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपये होती. आता म्हणजे २०२४ साली तीच मालमत्ता २ कोटी ८१ लाख ३४ हजार ८८६६ रुपये एवढी झाली आहे. या मालमत्ता वाढीची कारणंही राजू शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.
या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजीत पाटील आहेत. यामुळे आता ही निवडणूक जोरदार होणार आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.