कोल्हापूरमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच रांगा; सकाळी फिरायला येणाऱ्यांनी केले मतदान
By समीर देशपांडे | Published: May 7, 2024 08:24 AM2024-05-07T08:24:39+5:302024-05-07T08:25:05+5:30
सकाळी सात वाजता जरी मतदान सुरू होणार असले तरी अनेक जण मतदान केंद्राच्या परिसरामध्ये आधीच आले होते.
समीर देशपांडे
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळी सात वाजताच काही ठिकाणी रांगा लावल्याचे चित्र कोल्हापूरमध्ये दिसून आले. सकाळी फिरायला येणाऱ्या अनेकांनी मतदान केंद्रावर येऊन लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावला. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक ही सकाळी लवकर मतदानाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.
सकाळी सात वाजता जरी मतदान सुरू होणार असले तरी अनेक जण मतदान केंद्राच्या परिसरामध्ये आधीच आले होते. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींची धावपळ सुरू असतानाच आणि प्रशासकीय कामकाज सुरू असतानाच अनेकानी रांगा लावून उभे राहणे पसंत केले. त्यामुळे सुरुवातीला केंद्र अधिकाऱ्यांनी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदानाची प्रक्रिया कशी होईल याची माहिती दिली आणि यानंतर रीतसर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येते. सकाळच्या टप्प्यातच मतदान करून उन्हामध्ये येणे टाळण्यासाठी नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे दिले आहे.राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सकाळच्या टप्प्यातच अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी कंबर कसली आहे.