निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:16 PM2024-06-03T16:16:27+5:302024-06-03T16:22:58+5:30
Lok Sabha Election 2024 : उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत, निकालाआधीच आता कोल्हापूरात शाहू माहारांचे पोस्टर लागले आहेत.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. निकालाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांनी तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता निकालाआधीच कोल्हापूर शहरात शाहू महाराज यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने जोरदार प्रचार केला होता. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आधी महाविकास आघाडीसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या क्षणी एकतर्फी राहिली नव्हती. महायुतीनेही जोरदार प्रचार केला होता.
एक्झिट पोलमध्येही शाहू महाराज आघाडीवर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना तर महायुतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, टिव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात शाहू महाराज आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत.
कोल्हापुरच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचे पोस्टर झळकले आहेत.
मविआने छत्रपतींच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतदानाच्या दिवशीही छत्रपतींचा प्रभाव दिसून आला. आता निकालाच्या आदल्या दिवशी खासदार म्हणून पोस्टर झळकले आहेत. "पोस्टरवर कोल्हापुरचा राजा, शाहू छत्रपती खासदार मजकूर आहे. मिरजकर तिकटी परिसरात हे पोस्टर लावण्यात आले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, आता टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे सत्यजित पाटी आघाडीवर असल्याचे दाखवले आहे.