लोकमत इफेक्ट : केशवरावमध्ये सुविधांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:05 PM2019-11-14T14:05:55+5:302019-11-14T14:08:28+5:30
कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्वच्छतागृहांची स्वच्छता या प्राथमिक गरजांची २४ तासांच्या आत पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कोल्हापूर : कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्वच्छतागृहांची स्वच्छता या प्राथमिक गरजांची २४ तासांच्या आत पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या आणि पाच वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात नुतनीकरण झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील गैरसोयींवर लोकमतच्या गुरुवारच्या अंकात विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. आज शुक्रवारपासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा आणि आयुक्तांनी मे महिन्यात घेतलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तसाहेब केशवरावचं पुढं काय झालं या मथळ््याखाली गैरसोयींवर प्रकाश टाकण्यात आला. आयुक्तांनी या वृत्ताची तातडीने दखल शुक्रवारी सकाळीच नाट्यगृहाशी संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली व प्राथमिक गरजांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश दिले.
परिसरात चोवीस तासांच्या आत पिण्याच्या पाण्याची सोय करा, मेकअप रुमची दुरुस्त, वातानुकुलित यंत्रणा (एसी)चे पॉवर प्लान्ट व त्याचे बिघडलेले सॉफ्टवेअर बदला, स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करून घ्या असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात वायरमन व इलेक्ट्री शियनची नियुक्ती करा, नाट्यगृहाच्या बाबतीत कोणतिही दिरंगाई किंवा वेळकाढूपणा करू नका अथवा कारणं सांगू नका अशी सक्त सुचनाही त्यांनी केली. नाट्यगृहाच्या कामासाठी विविध विभागांना पाठवल्या जाणाऱ्या नवीन पत्राची एक कॉपी माझ्याकडे सादर करा असेही त्यांनी सांगितले.
दहा हजारांचा राखीव फंड
नाट्यगृहातील किरकोळ दुरुस्त्या, लहान मोठ्या कामांसाठी किमान दहा हजारांचा राखीव फंड काढून ठेवण्याची सुचना आयुक्तांनी केली. नाट्यगृहासाठी दर महिन्याला कोणत्या गोष्टी लागतात त्यांची तयार करून लगेचच मंजूरी घ्या, मंजुरी नाही म्हणून काम थांबवू नका तसेच दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी दर महिन्याला बैठक घेण्यासही त्यांनी सांगितले.