‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’ दिमाखात सुरू

By admin | Published: March 5, 2017 12:52 AM2017-03-05T00:52:41+5:302017-03-05T00:52:41+5:30

मुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन; असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स

'Lokmat Gadgets Expo' started in Aim | ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’ दिमाखात सुरू

‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’ दिमाखात सुरू

Next

कोल्हापूर : परिपूर्ण कुटुंबाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून अद्ययावत, ब्रॅँडेड इलेक्ट्रॉनिक विश्वातील वस्तूंनी परिपूर्ण ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो २०१७’ या प्रदर्शनाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेस; तर असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि. हे आहेत.
ब्रॅँडेड लॅपटॉप, डेस्कटॉप, अद्ययावत स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुनिया हौशी कोल्हापूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे उद्या, सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेसचे सिद्धार्थ शहा, आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि.चे अरुण माणगावे, गिरीश सेल्सचे गिरीश शहा, सुभाष फोटोजचे शंभू ओऊळकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी उपस्थित होते.
शनिवार हा प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असला तरी सकाळपासूनच ग्राहकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील हे अनोखे प्रदर्शन ‘घरातल्या प्रत्येकासाठी.... प्रत्येक घरासाठी’ या थीमवर आधारलेले असल्यामुळे अनेकांनी कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यास उपस्थिती लावली होती. दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरविण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वच वर्गांसाठी आवश्यक सर्वच गॅझेट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे नागरिक प्रत्येक स्टॉलवर थांबून माहिती घेण्यात मग्न होते व अद्ययावत माहिती मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. स्टॉलवरील व्यक्तीही ग्राहकांच्या शंकांना उत्तरे देत होते; यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी येऊन विविध स्टॉलवरील अद्ययावत स्मार्टफोन, लॅपटॉप्सची माहिती घेतली. अनेकांनी आपल्या आवडीच्या वस्तूंचे बुकिंगही केले.
सर्वांसाठी उपयोगी पडतील अशा गॅझेटस्च्या दुनियेचे द्वार प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले असून, त्यामध्ये ब्रॅँडेड कंपन्यांच्या वैयक्तिक, गृहोपयोगी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तरी या प्रदर्शनाला हौशी कोल्हापूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील गॅझेट्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अर्थसाहाय्य, हप्त्यांची सोय यांसह विविध सवलती व आकर्षक आॅफर्सही देण्यात येत आहेत.ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक स्टॉलवर कार्ड पेमेंट, स्वाइपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनीही कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.

आयटीसह गृहोपयोगी गॅझेट्स या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यासाठी व खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही वस्तू या आज नाही तर उद्या हमखास उपयोगी पडणाऱ्या आहेत.
- अरुण माणगावे, आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि.

कोल्हापुरात असे गॅझेट्सचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.- सिद्धार्थ शहा, एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेस

प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर सर्व कंपन्यांच्या ब्रॅँडेड वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासह विविध आकर्षक आॅफर्स, अर्थसाहाय्य, सवलती, भेटवस्तू योजनाही यानिमित्ताने खरेदीदारांसाठी देण्यात येत आहेत.- गिरीश शहा, गिरीश सेल्स

खरेदीवर आकर्षक आॅफर्स
प्रदर्शनातील गॅझेट्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अर्थसाहाय्य, हप्त्यांची सोय यांसह विविध सवलती व आकर्षक आॅफर्सही देण्यात येत आहेत.

Web Title: 'Lokmat Gadgets Expo' started in Aim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.