‘लोकमत’ची पत्रकारिता आवडते, म्हणून आम्ही अंक घेतो, वाचकांसाठी धमाकेदार आॅफर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:12 PM2019-12-25T17:12:48+5:302019-12-25T17:16:59+5:30

‘लोकमत’च्या बातम्यांमध्ये सत्यता असते. भडकपणा टाळून सुरु असलेली पत्रकारिता आम्हांला आवडते म्हणूनच आम्ही रांगा लावून लोकमतची नोंदणी करत असल्याच्या प्रतिक्रिया मंगळवारी सजग वाचकांनी व्यक्त केल्या.

'Lokmat' loves journalism, so we take the numbers. | ‘लोकमत’ची पत्रकारिता आवडते, म्हणून आम्ही अंक घेतो, वाचकांसाठी धमाकेदार आॅफर योजना

‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकमत’ शहर कार्यालय येथे मंगळवारी नोंदणीसाठी व भेटवस्तू नेण्यासाठी वाचकांनी मोठी गर्दी केली होती.(छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ची पत्रकारिता आवडते, म्हणून आम्ही अंक घेतो, वाचकांसाठी धमाकेदार आॅफर योजनासजग वाचकांच्या प्रतिक्रिया : नोंदणीला वाचकांच्या सर्वत्र रांगा

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या बातम्यांमध्ये सत्यता असते. भडकपणा टाळून सुरु असलेली पत्रकारिता आम्हांला आवडते म्हणूनच आम्ही रांगा लावून लोकमतची नोंदणी करत असल्याच्या प्रतिक्रिया मंगळवारी सजग वाचकांनी व्यक्त केल्या.

‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. तिला उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी वाचकांची ‘लोकमत’ कार्यालयासह भेटवस्तू वाटप केंद्रांवर गर्दी होत आहे. या केंद्रांवर मंगळवारी दिवसभर वाचकांनी नवीन नोंदणी करण्यासाठी व भेटवस्तू नेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या.


या वाचक वर्गणीदार योजनेत वाचकाने २०० रुपये भरून ‘लोकमत’ची नोंदणी केल्यानंतर त्याला त्वरित ६५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू मोफत मिळत आहे. वाचकांच्या सोयीसाठी ‘लोकमत’ने शहराच्या विविध १२ ठिकाणी भेटवस्तू वाटपाची सोय केली आहे. ही केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहेत.

काही सेंटरसाठी मुदत वाढ

वाचकांच्या आग्रहास्तव काही सेंटरवर भेटवस्तू देण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. या योजनेंतर्गत वाचकाने दरमहा १०० रुपये वृत्तपत्र विक्रेत्यास द्यायचे आहेत. ही योजना १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी सुरू राहील. या योजनेसाठी वाचकांनी रोख २०० रुपये किंवा तेवढ्याच रकमेचा धनादेश, छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र व स्थानिक वृत्तपत्र विके्रत्याचे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये भरलेले कोणत्याही एका महिन्याचे बिल सोबत आणणे आवश्यक आहे.

‘लोकमत’मुळे घरातील लहान मुलांना वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली आहे. नियमित वृत्तपत्र वाचनामुळे मुलांचे सामान्यज्ञान वाढल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे.
- अ‍ॅड. शर्वरी सप्रे


शहरातील विविध समस्या ‘लोकमत’मध्ये ठळकपणे मांडल्या जातात. फक्त बातम्या प्रसिद्ध न करता त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. लोकमतची पत्रकारिता आम्हांला आवडते.
- किरण पाटील


दर्जेदार बातम्यांसह ‘लोकमत बाल विकास मंच’ आणि ‘सखी मंच’ यांच्यामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम चांगले आहेत. त्यामुळे मुलांसोबत घरातील महिलांना एकत्र येण्याची अनोखी संधी मिळते.
- राजकिरण सावडकर



प्रत्येक विषयाला ठळक प्रसिद्धी आणि न्याय देणारे ‘लोकमत’ हे धर्मभेदविरहित वृत्तपत्र आहे. सर्व क्षेत्रांतील बातम्याना न्याय मिळतो.
- जावेद चिखलीकर


गेली अनेक वर्र्षांपासून मी ‘लोकमत’चा वाचक आहे. ‘लोकमत’मधील भाषा साधी, सोपी असल्याने लवकर आकलन होते. क्रीडा, राजकीय, सामाजिक, आरोग्य, आदी सर्व बातम्या ठळकपणे मांडल्या जातात.
- उमेश बाणदार


‘सखी,’ ‘मंथन’ आणि ‘आॅक्सिजन’ या पुरवण्यांतील विविध विषय हे चालू जीवनाशी मार्मिकपणे जोडले गेले आहेत. शहरासह राज्य व देशातील सर्व प्रमुख बातम्या यामधून तत्काळ वाचनात येतात.
- अनिकेत सूर्यवंशी
 

 

Web Title: 'Lokmat' loves journalism, so we take the numbers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.