Lokmat Maha Marathon: आजच करा नोंदणी अन् जिंका लाखाेंची बक्षिसे; उरले केवळ दोन दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:12 PM2022-03-07T12:12:51+5:302022-03-07T12:27:13+5:30
आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन आदी वैशिष्ट्ये असणारी ही महामॅरेथॉन कोल्हापूरकरांची एक वेगळी ओळख
कोल्हापूर : लोकप्रियतेचा माईल स्टोन ठरलेल्या ‘लोकमत’ महामॅरेथाॅनच्या पाचव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यंदा कोल्हापुरात रविवारी (दि. १३) मार्चला ‘लोकमत’ महामॅरेथाॅन शर्यत रंगणार आहे. विजेत्यांना एकूण दहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. महामॅरेथाॅनच्या नावनोंदणीला दणकेबाज प्रतिसाद स्पर्धकांसह सर्वसामान्यांनीही दिला आहे.
कोरोना काळात मागील दोन वर्षांतील ही पहिलीच थेट मैदानातून होणारी मॅरेथाॅन असल्याने याबद्दल कोल्हापूरकरांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. गेली चार पर्व या महामॅरेथाॅनला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन आदी वैशिष्ट्ये असणारी ही महामॅरेथॉन कोल्हापूरकरांची एक वेगळी ओळख बनली आहे.
त्यात सहभागी होण्याचा अनुभव, आरोग्यदायी, आनंददायक आहे. त्यामुळे या मॅरेथाॅनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिक उत्सुक असतात. येथील पोलीस मुख्यालय मैदानात रविवारी (दि. १३) मार्चला पहाटे ५ वाजता या महामॅरेथाॅनला सुरुवात होईल. यात ३ किमीची फॅमिली रन, ५ किमी फन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यासाठी), दहा किमीची पाॅवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील), २१ किमी (१८ वर्षांपेक्षा जास्त) असेल.
विविध गटामधील विजेत्यांना एकूण दहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा.
नावनोंदणी येथे करा
यापूर्वीच्या महामॅरेथॉन सीझन-३ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथाॅनमय होणार आहे. महामॅरेथॉन सीझन ५ साठी नोंदणीस आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही नोंदणीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक उरले आहेत. ज्या इच्छुकांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/maha-marathon.kolhapur-०४४३११ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल क्रमांक विक्रांत देसाई ९६३७३३०७०० अथवा सचिन कोळी ९७६७२६४८८५ वर नोंदणी करता येणार आहे. लवकरात लवकर इच्छुकांनी नोंदणी करावी.
सात मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना सवलत मिळणार
जे नागरिक व ग्रुप ७ मार्चपर्यंत नावनोंदणी करणार आहेत, अशांना नोंदणी शुल्कात सवलत दिली जाणार आहे. VD30 या कोडचा वापर करावा.
धावणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित महामॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्याचा उत्सव साजरा होत आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचा उत्साही सहभाग, मनोरंजन, नेटके नियोजन आणि नागरिकांसाठी पाण्यापासून ते वैद्यकीय पथकापर्यंतच्या सोयी-सुविधा आहे. विजेत्यांसाठी बक्षिसे आहेत. येत्या रविवारी (दि. १३ मार्च) होणाऱ्या या उपक्रमात मी स्वत: सहभागी असणार आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने महामॅरेथॉन सहभागी व्हा आणि आरोग्यदायी उपक्रम सहकुटुंब अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे हा महत्त्वपूर्ण व्यायाय आहे. लोकमत महामॅरेथॉनच्या माध्यमातून ही सर्वांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन प्राप्त होण्यासाठी महामॅरेथॉनचा उपक्रम खरोखरच संजीवनी देणारा आहे. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन फिटनेस राखा. रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये मी सहभागी होऊन धावणार आहे, तुम्हीही धावा. - डॉ. तिरुपती काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा