लोकमत मॅरेथॉनचा उद्या ‘बिब कलेक्शन एक्स्पो’, धावपटूंना तज्ज्ञ देणार आरोग्यविषयक टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:53 AM2022-03-11T11:53:16+5:302022-03-11T11:55:56+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना उद्या, शनिवारी (दि. १२) सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत पोलीस मुख्यालयातील अलंकार हाॅलमध्ये टी-शर्ट आणि बिब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.

Lokmat Marathon's Bib Collection Expo tomorrow, experts will give health tips to runners | लोकमत मॅरेथॉनचा उद्या ‘बिब कलेक्शन एक्स्पो’, धावपटूंना तज्ज्ञ देणार आरोग्यविषयक टिप्स

लोकमत मॅरेथॉनचा उद्या ‘बिब कलेक्शन एक्स्पो’, धावपटूंना तज्ज्ञ देणार आरोग्यविषयक टिप्स

Next

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना उद्या, शनिवारी (दि. १२) सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत पोलीस मुख्यालयातील अलंकार हाॅलमध्ये टी-शर्ट आणि बिब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.

सकाळी दहा वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र चव्हाण, वारणा दूध संघाचे मार्केटिंग विभागप्रमुख अनिल हेर्ले, घोडावत कंझ्युमर लिमिटेडचे संचालक साहिल शहा या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

ज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेली आहे, त्यांना मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे. सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे ॲथॅारिटी लेटर, रिसिट, ई-मेल्स पाठवून द्यावे; तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.

‘एक्स्पो’चे आकर्षण

  • महामॅरेथॉन स्पर्धेच्या बिब आणि टी-शर्ट वाटपासाठी अलंकार हाॅलमध्ये धावपटूंसाठी सेमिनारचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता धावपटूंसाठी एक्स्पो खुले करण्यात येईल. धावपटूंचे स्वागत होणार असून, सकाळी १० ते ११ वा. प्रसिद्ध बासरीवादक व जीवगाणे फेम सचिन जगताप यांचे बासरीवादन, सकाळी ११.१५ वाजता उद्घाटन, त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी ॲन्ड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या फिजिओथेरपिस्ट डाॅ. मनीषा जैन या ‘धावताना होणाऱ्या इजा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
  •  दुपारी १.०० वाजता पेसर धावण्याविषयी टिप्स देणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता आयर्नमन यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
  •  दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत डाॅ. प्रिया दंडगे या ‘धावपटूसाठी पाणी आणि पोषणाचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
  • दुपारी ३ ते ४ यादरम्यान अमोल घोंगडे हे राॅक बॅन्ड सादर करणार आहेत. दुपारी ४ ते ४.३० यादरम्यान महामॅरेथाॅनचा नवीन मार्ग व त्या मार्गावरील उपलब्ध सुविधा, पाच किलोमीटरची मार्ग नियमावली, मार्गावरील मदत, अत्यावश्यक सेवा, वाॅटर स्टेशन्स आणि कोविड नियमावलीची माहिती दिली जाणार आहे.
  • सायंकाळी ५ ते ५.३० यादरम्यान प्रसिद्ध कार्डिओलाॅजिस्ट डाॅ. संजय देसाई हे ‘मॅरेथाॅनदरम्यान हृदयाची काळजी कशी घ्यावी’ यावर, तर डाॅ. संदीप पाटील हे सुदृढ आरोग्याविषयी टिप्स देणार आहेत.
  • सायंकाळी ५.३० ते ६ यादरम्यान एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या उत्पादनाविषयी माहिती देणार आहेत.
  • त्यानंतर २१ किलोमीटर, १० किलोमीटर (नवीन मार्ग), ५ किलोमीटर मार्ग नियमावली याविषयी माहिती व चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.वा. ‘बिब एक्स्पो’चा समारोप होईल.
     

क्रोमा स्टॉलमध्ये ई-वेस्ट द्या

आता जबाबदारीने वागण्याची तुमची वेळ आहे. (ई-वेस्ट जमा करण्याच्या जागेचे नाव लिहा.) येथे या आणि तुमचे ई-वेस्ट द्या, क्रोमामध्ये आम्ही या ई-वेस्टची जबाबदारीने विल्हेवाट लावली जाईल. हे सुनिश्चित करू

Web Title: Lokmat Marathon's Bib Collection Expo tomorrow, experts will give health tips to runners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.