राधानगरीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या गोव्यातील प्रवाशांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:15 PM2019-08-06T21:15:32+5:302019-08-06T21:16:37+5:30
फेजिवडे येथील स्मशानशेड जवळ अडकलेल्या दोन ट्रॅव्हल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढल्या आहेत व त्या सध्या फेजीवडे गावात लावण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : पुणे-मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या २५ ट्रॅव्हल तसेच अन्य छोटया- मोठया अशी जवळपास १५० वाहने व त्यातील ६०० प्रवाशी फेजीवडे येथे अडकले होते. त्यांची राधानगरी, फेजीवडे ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली आहे. या २५ गाड्यांमधील अंदाजे ६०० प्रवासी गोव्यातील आहेत, त्यातील अनेक प्रवासी हे परदेशी आहेत. या सर्व प्रवाशाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
फेजीवडे गावचे सरपंच , उपसरपंच, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, या अधिकारी तसेच राधानगरी भाजप तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेट्ये आदी पदाधिकाऱ्यांनी योग्य ती मदत करत त्यांना राधानगरीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. त्यांनी राधानगरी आगारात आश्रय घेतला असून एस टी प्रशासनाने मुक्कमाची जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच येथील अंबाबाई मंदिरात काहीजनांची तर महिला व मुलांच्या मुक्कामाची काही घरांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान या सर्व प्रवाशांना येथील मुस्लीम बांधव रफीक नावळेकर यांनी मानवता व दातृत्वाच्या भावनेतुन स्वखर्चातून चहा, नाष्टा , व लहान मुलांच्या भोजनाची सोय करून दिली. या सर्व प्रवाशांनी नावळेकर कुटुंबीयांचे विशेष आभार मानले .
फेजिवडे येथील स्मशानशेड जवळ अडकलेल्या दोन ट्रॅव्हल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढल्या आहेत व त्या सध्या फेजीवडे गावात लावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोल्हापूरहून कणकवली -गोव्याकडे जाणाऱ्या कांही गाडया फेजीवडे येथे पाणी आल्याचा कारणास्तव राधानगरी आगारात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. यातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत .
पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशेहुन अधीक गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले होते. दरम्यान राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर फेजीवडे येथे बस पाण्यात अडकली होती. त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
फेजीवडे व राधानगरी ग्रामस्थांनी या सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित जागी हलवले आहे. अडकून पडलेल्या वृद्ध,महिला आणि मुलांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याची पातळी वाढत चालल्याने या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मंगळवारी पहाटेपासून हे पर्यटक राधानगरीत अडकून पडले आहेत. यामध्ये काही विदेशी पर्यटकांचा पण समावेश आहे.
तुफान पावसामुळे राधानगरीतील बहुतांशी हॉटेल, दुकाने बंद असल्यामुळे या सर्व प्रवाशी, लहान मुले, वृद्ध यांची खाण्या पिण्याचे खूप हाल होत होते, याची माहिती मिळताच राधानगरीचे माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांनी एस टी स्टॅन्ड येथे त्यांच्या जेवणाची व अल्पोपहाराची सोय केलेली आहे. स्थानिक एस टी प्रशासनाने यासाठी सहकार्य केले असून, आता सर्व पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत. यामधील महिला प्रवाशांना गावातील घरामध्ये आज निवासाची पण सोय करणार असलेची अभिजित तायशेटे यांनी सांगितले.
संपर्काचे आवाहन
सध्या राधानगरी मध्ये वीज व फोन रेंज नसले मुले या प्रवाशांच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना संपर्क करायचा असल्यास 02321-234024 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.