‘लोकमत’ आता दरमहा ७० रुपयांत
By admin | Published: February 14, 2015 12:05 AM2015-02-14T00:05:04+5:302015-02-14T00:06:32+5:30
वाचकांसाठी महाबचत योजना : नोंदणी करा आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू
'कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापुरातील प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नात जागल्याची भूमिका ‘लोकमत’ बजावत आहे. ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. ‘लोकमत’ने वाचकांसाठी कोल्हापूर शहरात यावर्षी ‘महाबचत’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत ‘लोकमत’साठी नोंदणी सुरू आहे. त्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
गतवर्षीही ‘लोकमत’ने ही योजना राबविली होती. वाचकांच्या आग्रहानुसार यावर्षी ती ‘महाबचत’ या नव्या स्वरुपात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोनशे रुपयांचा चेक (धनादेश) अथवा रोख रक्कम देऊन वाचकांना एक वर्षासाठी ‘लोकमत’च्या अंकाची नोंदणी करता येणार आहे. अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’या नावाने वृत्तपत्र विक्रेत्यांकडे जमा करावा. नोंदणी केल्यानंतर लगेचच २५० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. त्यानंतर दरमहा केवळ ७० रुपये बिलाच्या स्वरूपात वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्यावे लागणार आहेत. आठव्या महिन्यानंतर ५५० रुपयांची हमखास भेटवस्तू मिळणार आहे.
योजना कोल्हापूर शहर आणि उपनगरांसाठी मर्यादित आहे. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चे वाचक होण्यासाठी अंकाची नोंदणीकरिता विक्रेत्यांसह ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्यांकडे जमा करावा.
रोख रक्कम देऊनही नोंदणी करण्याची सुविधा
योजना कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी मर्यादित
वाचकांना १२०० रुपयांचा मोठा फायदा
योजनेअंतर्गत वाचकांनी अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने अथवा रोख स्वरूपात रक्कम आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे अथवा ‘लोकमत’ कार्यालयात द्यावयाची. त्यानंतर दरमहा ७० रुपये वृत्तपत्र विक्रेत्याला द्यायचे. नोंदणीनंतर ‘लोकमत’ वर्षभर १४४० रुपयांचे अंक, तसेच २५० रुपयांची पहिली भेटवस्तू आणि आठ महिन्यांनंतर ५५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू देणार आहे. वाचकांना नोंदणीसाठी एका वर्षासाठी दोनशे रुपये व दरमहा ७० असे एकूण १०४० रुपये द्यावे लागणार आहेत. त्या बदल्यात ८०० रुपयांच्या दोन भेटवस्तू आणि १४४० रुपयांचा अंक वर्षभर मिळणार आहे. यात वाचकांचा १२०० रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.
नोंदणी, अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
योजनेची अधिक माहिती आणि अंकाच्या नोंदणीसाठी ९८५०३८८३८४, ९९२२९१९४५३, ९९२२९१९४३९ अथवा (०२३०) २४६९४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.