‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल

By Admin | Published: March 13, 2016 01:22 AM2016-03-13T01:22:15+5:302016-03-13T01:22:15+5:30

दिमाखदार प्रारंभ : स्वप्नातील घरासाठी अनेकांकडून नोंदणी

'Lokmat-Pune Property Showcase' HouseFull on the very first day | ‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल

‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल

googlenewsNext

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ असणाऱ्या पुण्यात घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. अशा कोल्हापूरकरांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१६’ या गृहप्रदर्शनाद्वारे संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनाला शनिवारी पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात अनेकांनी फ्लॅटची नोंदणी करून आपले गृहस्वप्न सत्यात साकारले.
येथील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमधील प्रदर्शनात पुण्यातील नामांकित व प्रथितयश अशा वीस बांधकाम व्यावसायिकांनी १३५ गृहप्रकल्प सादर केले आहेत. पुण्यातील दर्जेदार गृहप्रकल्पांतील सदनिका, रो हाउसेस, बंगलो, फ्लॅट आणि व्यावसायिक मिळकती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनानिमित्त कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता झाले. उद्घाटनापूर्वीच नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. यात अनेकजण आपल्या कुटुंबीय व मित्रांसमवेत प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. दिवसभर नागरिक, ग्राहकांची प्रदर्शनस्थळी गर्दी होती. रात्री साडेआठपर्यंत ती कायम होती.
प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या स्टॉलवर जाऊन ग्राहक चोखंदळपणे प्रत्येक गृहप्रकल्पाची माहिती घेत होते. काहीजण गृहप्रकल्पाचा दर्जा, सोयी-सुविधा, सुरक्षा यंत्रणा तसेच पुण्यापासून त्या गृहप्रकल्पाचे अंतर किती, याचीही माहिती घेत होते. काहीजणांनी या प्रदर्शनात फ्लॅटची नोंदणीदेखील केली आहे. त्यासह अनेकांनी पुण्यात जाऊन गृहप्रकल्प पाहण्याची तयारी केली. प्रत्येक स्टॉलवरून ग्राहक सर्व दृष्टींनी सोईचे घर पुण्यात कोठे उपलब्ध होईल, याची माहिती घेत होते. मध्यमवर्गीयांपासून ते उच्च मध्यमवर्गीय व प्रतिष्ठित श्रीमंतांपर्यंत अशा सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी वन बीएचकेपासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाउस, बंगलो, फ्लॅट याबरोबरच शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक मिळकतींचे प्रकार पाहून ग्राहकांनी प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त केले.
प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
पुण्यातील प्रत्येक दिशेकडील आणि सर्वांच्या खिशाला परवडणारी तसेच दर्जेदार प्रीमियम लक्झुरियस फ्लॅट, रो हाउस, बंगलो, फ्लॅट, आदींची माहिती देणाऱ्या ‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाचा आज, रविवारी शेवटचा दिवस आहे.
सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून यासाठी मोफत प्रवेश आहे. तरी, या प्रदर्शनाला कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी भेट देऊन आपले पुण्यातील घर नक्की करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
गार्डियन डेव्हलपर्स, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा़ लि़, पाटे डेव्हलपर्स, कुशल लँडमार्क्स प्रा़ लि़, सिटी कॉर्पोरेशन, वसुधा लँडमार्क्स प्रा़ लि़, गोयलगंगा ग्रुप, सिद्धिविनायक गु्रप्स, निर्माण डेव्हलपर्स, मॅपल शेल्टर्स, सारथी ग्रुप, साईरंग डेव्हलपर्स, द स्केपर्स, शारदा ग्रुप, पार्कन्स ग्रुप, भंडारी असोसिएट्स़, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, प्लॅटिनम प्रॉपर्टीज, ड्रीम्स ग्रुप.(प्रतिनिधी)
 

Web Title: 'Lokmat-Pune Property Showcase' HouseFull on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.