‘लोकमत’ शॉपिंग उत्सव जानेवारीत रंगणार

By admin | Published: December 17, 2015 12:21 AM2015-12-17T00:21:10+5:302015-12-17T01:19:35+5:30

स्टॉलचे बुकिंग सुरू : कुटुंबातील सर्वांची खरेदी एकाच छताखाली

'Lokmat' shopping festival to be played in January | ‘लोकमत’ शॉपिंग उत्सव जानेवारीत रंगणार

‘लोकमत’ शॉपिंग उत्सव जानेवारीत रंगणार

Next

कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांना सर्व वस्तू एकाच छताखाली, रास्त दरात खरेदी करता याव्यात, या उद्देशाने ‘लोकमत’तर्फे शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ ते १० जानेवारी २०१६ दरम्यान हा शॉपिंग उत्सव राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये भरविण्यात येणार आहे. येथील स्टॉलचे बुकिंग सुरू झाले असून, मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले आहेत. या शॉपिंग उत्सवाचे ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ हे मुख्य प्रायोजक आहेत.
नववर्षामध्ये अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा कल आला आहे. नागरिकांचा हा कल लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने या शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी खरेदी करता येणार आहे. येथे विशेषकरून ज्वेलरी आणि फायनान्स, सौंदर्यविषयक, वधू आणि विवाह, घर आणि स्वयंपाकघर, फॅशन आणि लाइफस्टाईल अशा सर्व प्रकारच्या वस्तू रास्त दरामध्ये खरेदी करता येणार आहेत. तसेच यांची सविस्तर माहिती येथे देण्यात येणार आहे.
स्थानिक कंपन्यांबरोबर राज्यभरातील नामांकित कंपन्या शॉपिंग उत्सवात सहभागी होत आहेत. उत्सवात मोजकेच पन्नास स्टॉल मांडण्यात येणार आहेत. या ठिकाणी सोने, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, लेदरच्या वस्तू, साड्या, घरसजावट आणि हस्तकला, घरगुती वस्तू मिळणार आहेत. यासह लग्नसोहळ्यासाठी लागणारे वेडिंग ड्रेस, मंगल कार्यालय, हनिमून पॅकेजेस, केश स्टायलिस्ट, मेकअप सेवा, भोजनविषयीच्या सर्व सेवांच्या माहितीचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत.
मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने स्टॉलधारकांनी या उत्सवात सहभागी होऊन आपल्या उद्योग व व्यवसायांत वाढ करण्यासाठी येथे लवकरात लवकर आपल्
ो स्टॉल बुकिंग करावे तसेच अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे किंवा सचिन ९७६७२६४८८५ व नितीन ७७९८३४४७४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lokmat' shopping festival to be played in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.