लोकमत शॉपिंग उत्सव ‘हाऊसफुल्ल’

By admin | Published: January 9, 2016 12:18 AM2016-01-09T00:18:10+5:302016-01-09T00:42:27+5:30

कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : खरेदीसह हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी; उत्सवाचे शेवटचे दोन दिवस

Lokmat Shopping Festival 'Housefull' | लोकमत शॉपिंग उत्सव ‘हाऊसफुल्ल’

लोकमत शॉपिंग उत्सव ‘हाऊसफुल्ल’

Next

कोल्हापूर : फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकॉरपासून रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी एकाच छताखाली उपलब्ध झालेल्या ‘लोकमत शॉपिंग उत्सव २०१६’ला शुक्रवारी कोल्हापूरकरांनी ‘हाऊसफुल्ल’ गर्दी केली. मनसोक्त खरेदीसह मनपसंत, लज्जतदार पदार्थांचा आस्वाद आबालवृद्धांनी घेतला. खरेदीसह हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या या उत्सवाचे आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
नववर्षात नवनवीन वस्तू व सेवा खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो, हे लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने हा शॉपिंग उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर, सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. कोल्हापुरातील परिपूर्ण कुटुंबासाठीचा सर्वांत मोठा खरेदी उत्सव असलेला ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला शुक्रवारी दिवसभर गर्दी झाली.
उत्सवातील फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अ‍ॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अ‍ॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉलवर प्रत्येक उत्पादनाचे वेगळेपण जाणून घेत अनेकजण कुटुंबासह नोंदणी करत होते. विविध प्रकारची लोणची, चटणी, बिस्किटे, दागिने आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या स्टॉलवर महिलांची अधिक गर्दी होती. सायंकाळनंतर गर्दीचा ओघ वाढला. उत्सवाची वेळ संपली तरी अनेकजण येत होते. खरेदीनंतर अख्खा मसूर, स्वीट कॉर्नभेळ, रोटी, ढोकळा, कच्छी दाबेली, अशा लज्जतदार पदार्थांचा उत्सवाला भेट देणाऱ्या अबालवृद्धांनी आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)


‘लकी ड्रॉ’तील विजेते
शॉपिंग उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी ‘लोकमत’ने लकी ड्रॉ आयोजित केला आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये ‘चिपडे सराफ’तर्फे देण्यात येणाऱ्या सोन्याच्या नथीचे मानकरी श्रीहरी कुलकर्णी ठरले. मेसर्स श्री गणेश एंटरप्रायझेसतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘वॉटर प्युरिफायर’च्या विजेत्या विजयमाला पाटील आणि स्लीपवेलच्या बेडशीटच्या विजेत्या अनिता शिंदे ठरल्या. ‘द नीड’च्या आकर्षक भेटवस्तूचे विजेते अमित महाडिक, तर स्वप्निल केंद्रे, तौसिफ जांभेकर, वर्षा भंडारी, के. बी. चौगुले, रूपाली पाटील, आदित्य कोठावळे हे अन्य बक्षिसांचे मानकरी ठरले.


जाऊबाई जोरात,
चित्रकला स्पर्धा आज
उत्सवांतर्गत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत’ सखी मंच आणि बालविकास मंचतर्फे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात बालविकास मंचतर्फे आज, शनिवारी (दि. ९) दुपारी साडेचार वाजता ‘माझे आवडते कार्टून’ विषयावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. सखी मंचतर्फेसायंकाळी साडेपाच वाजता जाऊबाई जोरात स्पर्धा होईल.


सुंदर साडी, उखाणे स्पर्धा रंगली
उत्सवांतर्गत ‘लोकमत’ सखी मंचतर्फे शुक्रवारी सायंकाळी सुंदर साडी आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यातील सुंदर साडी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी अस्सल कोल्हापुरी, राजस्थानी, दाक्षिणात्य, कशिदा केलेल्या, रेश्मी आदी प्रकारांतील सुंदर साड्या सादर केल्या. शिवाय साडींबाबतच्या आठवणी सांगितल्या. यात स्मिता वडगावकर (प्रथम), कविता पाटील (द्वितीय), राजेश्वरी मोटे (तृतीय), कोमल साखळकर (उत्तेजनार्थ) विजेत्या ठरल्या.
शुभलक्ष्मी देसाई, अंजली ढोकर, स्नेहा सारडा, वैजयंती कुलकर्णी, जयश्री अडसुळे, विजयमाला पाटील यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे द्वारकादास शामकुमार हे प्रायोजक आहेत. उखाणे स्पर्धेत स्पर्धकांनी विनोदात्मक, सामाजिक, प्रबोधनपर उखाणे सादर केले. यात अंजली ढोकर (प्रथम), अलका जोशी (द्वितीय), विमल चौगले (तृतीय), आशा जगताप, नीता मंडेद (उत्तेजनार्थ) विजेत्या ठरल्या. बबिता पंडत, ज्योती कुमठेकर, कविता पाटील, वनिता बक्षी, आस्मा सय्यद, उज्ज्वला चौगले यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.

Web Title: Lokmat Shopping Festival 'Housefull'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.