लोकमत शॉपिंग उत्सवास प्रारंभ
By admin | Published: January 7, 2017 01:23 AM2017-01-07T01:23:55+5:302017-01-07T01:23:55+5:30
कोल्हापूरकरांची गर्दी : लघुउद्योजकांपासून, मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या विविध ब्रँडच्या वस्तू उपलब्ध
कोल्हापूर : हौशी कोल्हापूरकरांना फॅशनच्या कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरिफायरसारख्या होम अॅप्लायन्सेसपासून मोबाईल अॅक्सेसरिजपर्यंत, चटपटीत खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंत, केसातील पिनांपासून ते पायातल्या चपलांपर्यंत अशा वैविध्यपूर्ण वस्तूंच्या मनसोक्त खरेदीचा आनंद देणाऱ्या ‘लोकमत शॉपिंग उत्सव २०१७’चा शानदार प्रारंभ शुक्रवारी झाला. पहिल्याच दिवशी झालेल्या ग्राहकांच्या गर्दीने उत्सवाच्या यशस्वितेची मोहर उमटली.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या आणि डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये तब्बल चार दिवस रंगणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन प्रतिमा पाटील, ज्योती पाटील, सोनाली चिपडे, वर्षा पोवार व वसुंधरा शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नव्या वर्षाचे स्वागत खरेदी उत्सवाने करतानाच खवय्यांना चटपटीत पदार्थांचा आस्वाद आणि हजारोंची बक्षिसे जिंकून देणाऱ्या लोकमत शॉपिंग उत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉल्सवर गर्दी केली. या उत्सवाच्या निमित्ताने चार दिवस ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण खरेदीचे नवे दालन उपलब्ध झाले. या उत्सवाला काविरा नॅचरल्स याचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. ‘परफेक्ट किचन ट्रॉली अॅन्ड फर्निचर’ यांचे संयुक्त सहप्रायोजकत्व तर चॅनेल पार्टनर म्हणून ‘एसपीएन डिजिटल’ यांचे सहकार्य लाभले आहे.
उत्सवाच्या निमित्ताने हॉलसह बाह्य परिसरातही स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच खरेदीचा सुरू होणारा हा प्रवास किमान तासभर तरी ग्राहकांना वैविध्यपूर्ण वस्तू पाहिल्याचा, खरेदी केल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद देतो. ताण-तणावाच्या जीवनशैलीत डायट फूड, सेंद्रीय धान्य, स्वच्छ पाणी, आयुर्वेदिक औषधी, नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या चोखंदळ ग्राहकांची आवड-निवड आणि त्यांच्या बजेटचा विचार करून मांडण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलवर एखादी तरी वस्तू खरेदी केल्याशिवाय पाय पुढे सरकत नाही.
कोल्हापुरातील लघु उद्योजकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या विविध ब्रँडच्या आकर्षक वस्तू या खरेदी उत्सवात पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. ‘एकाच छताखाली अख्ख्या कुटुंबाच्या खरेदी’चा आनंद देणारा हा उत्सव कोल्हापूरकरांमधील खवय्येगिरीलाही तृप्त करणारा आहे. उत्सवात लहान मुलांच्या खेळण्यांपासून, तरुणाईसाठी दुचाकी, चारचाकी गाड्या, नव-नव्या अॅक्सेसरिज, संगणक खरेदी-विक्री, संगणक अॅक्सेसरीज, तरुणींसाठी नव्या ट्रेंडचे कपडे, बांगड्या, मोत्याचे दागिने, आयुर्वेद, पंचकर्म, बिस्किटे, फॅशनचे चप्पल, शूज, थ्रेडिंग ज्वेलरी, गृहिणींच्या आवडत्या डिझायनर साड्या, गृहसजावटीच्या वस्तू, फर्निचर, पडदे, कव्हर, महिलांचे काम हलके करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक गॅझेट्स, फायनान्स, सौंदर्य, विवाहविषयक वस्तू, शेंगदाणा चटणीसह चटण्यांचे विविध प्रकार, घरी बनविलेली चॉकलेट, तिळाचे लाडू, विविध प्रकारची पीठं, सर्वप्रकारचे लोणची, खाकरा, फॅशन आणि लाईफ स्टाईल अशा सर्व प्रकारच्या सेवा व वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. चार दिवस रंगणाऱ्या ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीसोबतच बक्षिसांचा आनंद लुटा. .
लकी ड्रॉमध्ये तागडेंना सोन्याची नथ, तर कुंभार यांना सिल्कची साडी
उत्सवांतर्गत चार दिवस विविध स्टॉल्सवर विविध वस्तूंची खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. शुक्रवारी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये धनंजय तागडे यांना चिपडे सराफ यांच्याकडून ‘सोन्याची नथ’ बक्षीस म्हणून मिळाले. मंगल कुंभार यांना द्वारकादास शामकुमार यांच्यातर्फे सिल्कची साडी, व्ही. एस. कोकाटे यांना निओ एंटरप्रायजेसतर्फे वॉटर प्युरिफायर, सुजाता कुंभार यांना विप्रास टेक्नोमार्टतर्फे एक क्विक हिल अॅन्टीव्हायरस, बळवंत पाटील व वीणा पाटील यांना नेट प्रोटेक्टर अॅन्टी व्हायरसतर्फे बॅग, शुभांगी बिडकर, मधुरा साळुंखे, उज्ज्वला सावंत, सुरेखा कावडे, नक्षा धाकरे यांना ‘पिझ्झा हट’तर्फे गिफ्ट व्हौचर, भाग्यश्री धर्मे, मंगेश जगताप, प्रसाद रोटे, पल्लवी फल्ले, प्रणाली पोवार, आर. जी. पटवर्धन, सुरेखा सांगावकर, विद्या कुंभार, रेवती धवणकर, संभाजी पाटील युएलसी अॅक्वा बीज प्रा. लि. यांच्याकडून अँटी रेडिएशन चीप, गॅस सेफ्टी डिव्हाईस ही बक्षिसे जाहीर झाली. विजेत्यांनी बक्षिसे दुपारी १२ ते २ या वेळेत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथून घेऊन जावीत, अधिक माहितीसाठी ८६००३७२२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
बजेटमध्ये दर्जेदार वस्तू
उत्सवात सहभागी स्टॉल्सवर उच्चमध्यम वर्गीयांपासून ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या वस्तू आणि साहित्य उपलब्ध आहेत.
प्र्रत्येक स्टॉलवर तुमच्या आवडीच्या आणि निवडीच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या ठरलेल्या बजेटमध्ये प्रत्येकाला येथील स्टॉल्सवर खरेदी करता येणार आहे.
लज्जतदार पदार्थांची मेजवानी
हॉलमध्ये फिरून बाहेर आलात की नागेश यांच्या न्यू गणेश फूड स्टॉलवरील अस्सल कोल्हापुरी शाकाहारी पदार्थांच्या घमघमाटाने या पदार्थांचे आस्वाद घेण्याची इच्छा होते. फ्रूट डिश, व्हेज चायनीज, प्लेवर्ड ज्यूस, पिझ्झा, डोसा, पावभाजी, सँडविच, स्पेशल लोणी थालीपीठ, खास बच्चे कंपनीसाठी पॉपकॉर्न, शुगर कँडी अशा लज्जतदार पदार्थांची चव जिभेवर रेंगाळते.