‘लोकमत शॉपिंग उत्सव आजपासून’

By admin | Published: January 7, 2016 01:08 AM2016-01-07T01:08:03+5:302016-01-07T01:08:48+5:30

खरेदी करा व हजारोंची बक्षिसे जिंका : मनपसंत खाद्यपदार्थांचा आनंद लुटण्याची संधी

'Lokmat Shopping Festival from today' | ‘लोकमत शॉपिंग उत्सव आजपासून’

‘लोकमत शॉपिंग उत्सव आजपासून’

Next

कोल्हापूर : कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ची आज, गुरुवारी धुमधडाक्यात सुरुवात होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये शॉपिंग उत्सव खुले होणार असल्याने कोल्हापूरकरांना मनसोक्त शॉपिंगसोबत लज्जतदार पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. या उत्सवाचे उद्घाटन वॉव ज्वेल कलेक्शनचे नीलेश झवेरी व धीरज राठोड तसेच हॅपी हाऊसचे राजेश कोलार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नववर्षात नवनवीन वस्तू व सेवा खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. हे लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने या शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसाठीची खरेदी करता येणार आहे. फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अ‍ॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अ‍ॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, फूड प्रॉडक्टस्, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. या ठिकाणी मांडण्यात आलेल्या वस्तूंवर आकर्षक सवलत देण्यात येणार आहे.
यासोबत मनपसंत खाद्य आणि सोबत खरेदी एकाचवेळी करता येणार आहे. त्यामध्ये खवय्याप्रेमी कोल्हापूरकरांसाठी अख्खा मसूर, रोटी, ढोकळा, विविध प्रकारची लोणची, चटणी आणि रोजच्या वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व काही सवलतीच्या दरात ‘एकाच ठिकाणी’ मिळणार आहे. ( प्रतिनिधी )

सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले
हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असणार आहे.
ग्राहकांना प्रदर्शनामध्ये चारचाकी वाहनांपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध
वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सवलत मिळणार आहे.
‘लोकमत’तर्फे दररोज लकी ड्रॉ मध्ये हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

Web Title: 'Lokmat Shopping Festival from today'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.