नागनवाडी येथे रविवारी ‘लोकमत’चे महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:57+5:302021-07-09T04:16:57+5:30
नवी मुंबई येथील जीवन फाउंडेशन आणि 'महाराष्ट्र राज्य मराठा ऑर्गनायझेन'च्या पुढाकाराने नागनवाडी (ता. भुदरगड) येथील श्री.विठ्ठल मंदिरात आयोजित ‘लोकमत’चे ...
नवी मुंबई येथील जीवन फाउंडेशन आणि 'महाराष्ट्र राज्य मराठा ऑर्गनायझेन'च्या पुढाकाराने नागनवाडी (ता. भुदरगड) येथील श्री.विठ्ठल मंदिरात आयोजित ‘लोकमत’चे महारक्तदान शिबिर रविवार (११) रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे.
'लोकमत नातं रक्ताचं' या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी अभियानांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी गडहिंग्लज येथील डॉ. आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे.
'जीवन फाउंडेशन'चे खजिनदार सुयोग साळोखे, डोंबिवली शहर मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रमोद साळोखे, डिलाईल रोड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रमोद साळवी यांनी या शिबिराचे नियोजन केले आहे.
भुदरगडचे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर व पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत परुळेकर यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.
यावेळी नागणवाडीचे माजी सरपंच अशोक साळोखे, सरपंच तानाजी कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.