दीर्घांक लेखन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:38+5:302021-03-10T04:25:38+5:30
कोल्हापूर : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली व टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आनंदी शिक्षणाचा उंबरठा या ...
कोल्हापूर : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली व टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आनंदी शिक्षणाचा उंबरठा या विषयावर राज्यस्तरीय मराठी दीर्घांक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या शिक्षणाबाबत विविध पातळीवर समस्या भेडसावत असून अनास्थेमुळे शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे. शिक्षण ही निरंतर आणि व्यवसायाभिमुख प्रक्रिया आहे, अशा आशय विषयांचा धांडोळा घेऊन उत्तम नाट्य निर्मिती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. यासाठी रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पारितोषिक आहे. तरी इच्छुकांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारा विष्णुदास भावे नाट्य मंदिर, हरभट रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
बाळाचे पालक कोण?
कोल्हापूर : बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालकल्याण संकुलाच्या शिशुगृहात विनिता ही १२ महिन्यांची बालिका १४ जानेवारी २०२० रोजी दाखल झाली आहे. कोडोली पोलीस स्टेशनमार्फत दाखल झालेल्या या बालिकेच्या चौकशीसाठी कोणीही आलेले नाही.
तरी त्यांच्या पालकांपैकी कोणी असल्यास त्यांनी बालकल्याण संकुल, मंगळवार पेठ, पाण्याच्या खजिन्याजवळ येथे संपर्क साधावा, मुदतीत बालकाप्रती पालक असल्याचा दावा न झाल्यास कारा गाइड लाइननुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे बालकल्याण समितीने कळवले आहे.
--
फोटो नं ०९०३२०२१-कोल-विनिता
--