कागलमधील आठ ग्रामपंचायत इमारतीचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:20+5:302021-02-06T04:44:20+5:30

म्हाकवे : कागल तालुक्यातील म्हाकवे, लिंगनूर-कापशी, गोरंबे यासह शिंदेवाडी, सोनाळी, वडगाव, हमिदवाडा,अर्जुनवाडा या जीर्ण झालेल्या आणि अडचणींतूनच कारभार करणाऱ्या ...

The look of eight Gram Panchayat buildings in Kagal will be changed | कागलमधील आठ ग्रामपंचायत इमारतीचे रूपडे पालटणार

कागलमधील आठ ग्रामपंचायत इमारतीचे रूपडे पालटणार

Next

म्हाकवे : कागल तालुक्यातील म्हाकवे, लिंगनूर-कापशी, गोरंबे यासह शिंदेवाडी, सोनाळी, वडगाव, हमिदवाडा,अर्जुनवाडा या जीर्ण झालेल्या आणि अडचणींतूनच कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मिळणार आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे रूपडे पालटणार आहे. बहुतांशी गावांतील ग्रामपंचायतींच्या इमारती या स्वातंत्र्यपूर्व काळात कौलारू स्वरूपातच बांधण्यात आल्या आहेत तर अनेक ग्रामपंचायतींत मिटिंग हाॅल, प्रशासनासाठी स्वतंत्र केबिन, संगणक कक्षाची सोयच नाही. त्यामुळे कारभारात नेटकेपणा येत नाही. त्याची दखल घेत ग्रामविकास विभागाने या गावातील इमारती सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित गावातील नागरिकांतून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नव्याने इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळालेल्या अन्य ग्रामपंचायती व कंसात तालुका-जखेवाडी,(गडहिंग्लज), होन्याळी, बेलेवाडी-हुबळगी (आजरा), मौजे कुदनुर (चंदगड), कांचनवाडी व कळंबे तर्फ ठाणे (करवीर), कांबळवाडी (राधानगरी), भादोले (हातकणंगले), निमशिरगाव (शिरोळ)

लिंगनूर-कापशीत आरोग्य उपकेंद्राला मंजुरी

लिंगनूर-कापशी येथे आरोग्य उपकेंद्रच नसल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत.ना.हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरीसाठी प्रयत्न केले.त्यामुळे आपल्या गावात उपकेंद्राला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे मावळते सरपंच मयूर आवळेकर यांनी सांगितले.

कोट....

"ग्रामपंचायत कार्यालय ही गावची शान असते.कार्यालय सुसज्ज आणि टापटीप असेल तर येथिल कामकाज अधिक गतीने होते.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध केला आहे.

हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री

Web Title: The look of eight Gram Panchayat buildings in Kagal will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.