हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:28 PM2020-12-25T17:28:31+5:302020-12-25T17:34:30+5:30

Christmas Kolhapur- हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला.

Lord, free the world from coronation: the prayer of the Christian brothers | हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

 कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नाताळचे स्वागत करण्यात आले. न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देहे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नाताळ साजरा

कोल्हापूर : हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला. त्यांनी प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त वायल्डर मेमोरिअलसह अन्य चर्चमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये प्रार्थना केली. लहान मुले, वृद्धांनी घरातूनच प्रार्थना करीत नाताळचे स्वागत केले. नवीन कपडे परिधान करून प्रार्थनेसाठी चर्चमध्ये आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

शहरातील वायल्डर मेमोरिअल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलिस्टस चर्च, ऑल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च, होली क्रॉस, सेवंथ डे, आदींसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले होते.

थर्मल गनने तपासून मास्क असल्याचे पाहून भाविकांना चर्चमध्ये प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका बेंचवर अंतर ठेवून दोघांची बैठक व्यवस्था केली होती. दरवर्षी प्रार्थनेचे तीन टप्पे होतात. यावेळी सहा ते सात टप्पे करण्यात आले.

हे प्रभू, देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो. जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना ख्रिस्ती बांधवांनी केली. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये रेव्हरंड डी. बी. समुद्रे, जे. ए. हिरवे, अशोक गायकवाड, सिनोय काळे यांनी नाताळचा संदेश दिला.

या ठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्च कमिटीचे आनंद म्हाळुंगेकर, संजय थोरात, विनय चोपडे, अतुल रुकडीकर, संदीप थोरात, सचिन समुद्रे, आदी उपस्थित होते. नाताळनिमित्त पुढील आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

वृध्द, लहान मुलांसाठी ऑनलाईन व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून चर्चमध्ये नाताळचे स्वागत करण्यात आले. सॅनिटायझर, थर्मल गन, आदींची व्यवस्था चर्चच्या प्रशासनाने केली. ६५ वर्षांवरील वृध्द आणि लहान मुलांना चर्चमध्ये प्रवेश दिला नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची व्यवस्था केली होती, असे वायल्डर मेमोरियल चर्चच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर यांनी सांगितले.


 

Web Title: Lord, free the world from coronation: the prayer of the Christian brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.