भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भगवान काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:31 PM2020-03-12T17:31:10+5:302020-03-12T17:34:47+5:30

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शेतकरी नेते भगवान काटे यांची, तर जिल्हा महिला अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.

Lord Kisan Morcha is the district president | भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भगवान काटे

भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भगवान काटे

Next
ठळक मुद्देशौमिका महाडिक महिला जिल्हाध्यक्षकार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शेतकरी नेते भगवान काटे यांची, तर जिल्हा महिला अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.

युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी शिरोळचे पृथ्वीराज अशोक यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी (आजरा), अजिंक्य अरुण इंगवले (हातकणंगले), माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई (भुदरगड), नाथाजी पाटील (भुदरगड), अशोक चौगले (पेठवडगाव हातकणंगले), गोविंद पाटील (चंदगड), शांताराम पाटील (चंदगड), जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (शिरोळ), जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील (कबनूर हातकणंगले) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. सुनील मगदूम (सिद्धनेर्ली, कागल), शिवाजी बुवा (शिये करवीर) यांची सरचिटणीस म्हणून, तर विठ्ठल पाटील (जयसिंगपूर), डॉ. अजय चौगले (पन्हाळा), दत्तात्रय मेडश्ािंगे (करवीर) यांची चिटणीस म्हणून कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी प्रताप कोंडेकर (गिरगाव करवीर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Lord Kisan Morcha is the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.