चार विद्यार्थी शोधण्यासाठी १०० विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:51+5:302021-03-10T04:25:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथे शिक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधात गल्लीगल्लीत वीटभट्टी व ऊसतोड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथे शिक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधात गल्लीगल्लीत वीटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये शाळेच्या वेळेत फिरत आहेत. यामुळे शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच जागेवर नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात सर्वच शाळांत ही परिस्थिती आहे.
वाकरे येथे कन्या व कुमार विद्यामंदिरमध्ये ४०० ते ५०० विद्यार्थी शिकत आहेत. महामारीच्या काळात गेले सात ते आठ महिने शाळांचे दरवाजे बंद होते. या वर्षीचे शैक्षणिक वर्षे झाले आहे. तेही प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सक्त नियम पाळून या वर्षीचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. प्राथमिक शाळा सकाळी ११ ते २ भरवण्यात येत आहेत. पालक मुलांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडत आहेत.
पण, शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा अहवाल १० एप्रिलच्या आत देण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत. म्हणून शिक्षक गावातील गल्लीगल्लीत, वीटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या झोपड्या शोधत आहेत. हे काम शिक्षक शाळेच्या वेळेतच करत असल्याने शाळेत असणारी २०० ते ४०० विद्यार्थी वर्गाऐवजी मैदानावर दिसत आहेत. याबाबत पालकांच्या तक्रारी शिक्षण व्यवस्थापन समितीकडे गेल्याने काही गावांत शाळेत जाऊन याबाबत जाब विचारला जात आहे.
प्रतिक्रिया १) एस. के. यादव (गटशिक्षणाधिकारी करवीर)-- १० एप्रिल पर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाचे आहेत, हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि हे काम कोणत्या वेळेत करायचे याबाबत बंधन नसल्याने शिक्षक शाळेच्या वेळेत हे काम करतात यात काही गैर नाही अशाप्रकारे गटशिक्षणाधिकारी यांनी त्याचे समर्थन केले. २) कृष्णात पाटील (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वाकरे) आता कुठे शाळा सुरू झाल्या आहेत. वर्ष संपत आले आहे तरी २ शिक्षकपदे रिक्त आहेत तर एखादा शिक्षक रजेवर गेला तर अडचण. चार शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षक गल्लोगल्ली फिरत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून शाळेत असणारे ४०० विद्यार्थी मैदानावर खेळताना दिसत आहेत, याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे. ३) बी. के. चव्हाण (मुख्याध्यापक)