काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

By Admin | Published: April 27, 2015 09:44 PM2015-04-27T21:44:31+5:302015-04-28T00:34:03+5:30

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार

Loss of agriculture due to leakage of Kalmamwadi canals | काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

googlenewsNext

निवास पाटील - सोळांकूर -काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतील सततची गळती व कालवे फुटीच्या प्रकारांमुळे कालव्यालगतच्या शेकडो एकर जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत, तर उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कालव्यांची अजूनही कामे अपूर्ण असताना केवळ राजकीय प्रेमापोटी पाणी सोडण्यात आले. सन १९९९ पासून दोन्ही कालव्यातून प्राथमिक अवस्थेत १०० ते ३०० क्युसेस दाबाने पाणी सोडले होते. सध्या सुमारे ८०० ते ९०० क्युसेस दाबाने पाणी सोडले जात आहे. एक ते आठ कि. मी.पर्यंत कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी केवळ दगड रचून, सिमेंट, वाळूचा मुलामा दिला आहे. याचबरोबर काही ठिकाणी कालव्यातील मुरुमाचा भराव काढण्यात आला आहे. काही लोक स्वार्थापोटी कालव्याला भगदाड पाडत आहेत, तर काही ठिकाणी कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत.
कालव्यातील पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. जिओसिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयत्न सफल न झाल्याने कालव्यांना सततची गळती आहे. परिणामी कालव्यालगतच्या शेतामध्ये सतत दलदल झाली आहे. दलदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. काही ठिकाणी खारफुटी बाधीत शेती झाली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक येत नसल्याने शेतकरी हबकला आहे. गळतीमुळे काही गावांतील घरांमध्ये उमाळे फुटले आहेत. गळतीबाबत मात्र ठोस असा निर्णय अजून तरी अंमलात आला नाही. काही ठिकाणी आरसीसी भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. यांचाही फारसा फरक नसल्याने अत्याधुनिक यंत्रणा अंमलात आणून ही गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.


कालव्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात, याचा योग्य उपयोग आवश्यक.
विचित्र भू-स्तरादरम्यान लोखंड अथवा सिमेंट पाईपचा वापर व्हावा.
पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक आवश्यक.
गळतीचे पाणी निचरा होण्यासाठी छोटे पाट करून ते पाणी ओढे-नाल्या'द्वारे नदीपात्रात सोडावेत.
खारफुटी शेतीचा नुकसानभरपाईबाबत
विचार व्हावा.

Web Title: Loss of agriculture due to leakage of Kalmamwadi canals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.