कचरा गाडीला आग लागून २५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:37+5:302020-12-16T04:39:37+5:30
केंद्र व राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थापन अनुदानातून मागील वर्षी नगरपालिकेस कॉम्पॅक्टर कचरा गाडी व घंटागाडी दिली आहे. या गाडीतून ...
केंद्र व राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थापन अनुदानातून मागील वर्षी नगरपालिकेस कॉम्पॅक्टर कचरा गाडी व घंटागाडी दिली आहे. या गाडीतून शहरातील कचरा गोळा करून सांगली रोडवरील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. मंगळवारी दुपारच्या सुमारास कचरा टाकून डेपोतून बाहेर पडत असताना कॉम्पॅक्टरचे चाक जमिनीमध्ये रूतले. त्यावेळी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गाडीला आग लागली. हे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडीतून बाहेर पडून अग्निशामक दलाला पाचारण केले, तोपर्यंत गाडीने पेट घेतला.
चौकट
नव्या गाडीला आग
वर्षभरापूर्वीच घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नगरपालिकेस २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामध्ये सात कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन व घंटागाडी खरेदीसाठी हा निधी वापरला आहे. परंतु वर्षभरातच या नव्या गाडीला आग लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
(फोटो ओळी)
१५१२२०२०-आयसीएच-०२
कचरा गाडीला आग लागून मोठे नुकसान झाले.