मुरगूड जांभुळखोरामध्ये चर फुटून दहा कोटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:11+5:302021-07-27T04:25:11+5:30
बोळावी - ठाणेवाडी डोंगरमाथ्यावरून तसेच अवचितवाडी उपराळ तलावाच्या सांडव्यातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत ते चरीद्वारे सर पिराजीराव तलावात ...
बोळावी - ठाणेवाडी डोंगरमाथ्यावरून तसेच अवचितवाडी उपराळ तलावाच्या सांडव्यातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत ते चरीद्वारे सर पिराजीराव तलावात येते. पण गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे शंभर वर्षे पूर्ण झालेल्या व बिनअस्तरीकरणाच्या चरीला अनेक ठिकाणी भगदाड पडून तेथील भरावही खचला. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह जांभुळखोरा नागरी वस्तीतील घरांमध्ये व शेतीपिकामध्ये गेल्याने प्रचंड नुकसान झाले. तसेच जांभुळखोरा वसाहतीतून मुरगूड व चिमगावकडे गेलेला रस्ताही खचला आहे. ऊस, भात व सोयाबीन पिके पूर्ण वाहून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठमोठे दगड, माती वाहून आल्याने शेतांचा नामशेष मिटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात चरीबाबत अशा घटना घडत आहेत.
फोटो ओळ :-
मुरगूड जांभुळखोरा (ता. कागल) येथून सर पिराजीराव तलावात पाणी घेऊन जाणारी चर अनेक ठिकाणी फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.