वॉटर एटीएम व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भरघोस निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:12+5:302021-08-19T04:27:12+5:30
बांबवडे (ता. शाहुवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ४ कोटी ६८ लाख रुपये तर, बांबवडे गावासाठी साडेचार लाख रुपयांची तरतूद ...
बांबवडे (ता. शाहुवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ४ कोटी ६८ लाख रुपये तर, बांबवडे गावासाठी साडेचार लाख रुपयांची तरतूद करून वॉटर एटीएम बसविण्यात येणार असल्याची माहिती जि. प. सदस्य विजय बोरगे यांनी दिली.
बांबवडे शाहुवाडी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे सर्व यंत्रणांवर अतिरिक्त ताण पडतो. त्याचा परिणाम आरोग्य विभागावर होतो. बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इमारतीमध्ये अनेक विभाग एकाच इमारतीमध्ये चालतात, ही गैरसोय दूर करण्यासाठी चार कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद झाली असून, त्यामध्ये विविध विभागांसाठी सुसज्ज इमारती उभारल्या जाणार आहेत.
बांबवडे गावामध्ये लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वॉटर एटीएम बसवण्यात येणार आहे.