प्रेम प्रकरणातून कोल्हापुरात युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 21, 2017 01:13 PM2017-03-21T13:13:06+5:302017-03-21T13:13:06+5:30
राजारामपुरीतील प्रकार : प्रकृत्ती चिंताजनक
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : कोल्हापुरात राजारामपुरी सातव्या गल्लीत मंगळवारी सकाळी बेशुध्द अवस्थेत युवती मिळून आल्याने खळबळ उडाली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिने विष प्राशन केल्याचे आढळताच पोलिसांनी शासकीय रुग्णवाहीकेतून तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. मंगल विठ्ठोबा निरुकेकर (वय २३ रा. माऊली पुतळा, राजारामपूरी, मुळ गाव तांब्याचीवाडी पैकी भटवाडी, ता. भूदरगड) असे तिचे नाव आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या पर्समध्ये ‘माणसाच जीवन, हे रांगोळीसारखे असते’ या शिर्षकाखाली प्रेमावर लिहलेली कवितेची चिठ्ठी मिळून आली. त्यावर मामाच्या घरचा पत्ता व मोबाईल नंबर होता. आत्महत्या करीत असलेचा उल्लेख मात्र तिने केला नव्हता. तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.
अधिक माहिती अशी, राजारामपुरी सातव्या गल्लीत रेड अॅन्ड टेलर या कापड दूकानाला लागून असलेल्या बोळात जिन्स पॅन्ट व शर्ट घातलेली युवती बेशुध्द अवस्थेत पडलेली फिरायला येणाऱ्या नागरिकांना दिसली. त्यांनी माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांना ही माहिती दिली. कवाळे यांनी घटनास्थळी येवून पाहिले असता युवती निपचित पडली होती. तिच्या शेजारी पर्स व विषाची बाटली पडली होती. त्यांनी राजारामपूरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस कॉन्स्टेबल अमल अवघडे, सिध्देश्वर केदार, प्रकाश पारधी, अर्चना जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवतीच्या तोंडातून उग्र वास येत होता. तिने विष प्राशन केल्याची खात्री होताच तिला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे मोबाईलवरुन तिच्या मित्र-मैत्रीणींशी पोलिस संपर्क साधत आहेत. तिचे वडील वन विभागात शिपाई आहेत. आई गृहिणी आहे. लहान भाऊ नववीला आहे. (प्रतिनिधी)
तीन दिवसांपासून बेपत्ता तिच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना बोलवून घेतले. चुलत मामा विठ्ठोबा रघुनाथ लाड यांच्याकडे ती राहते. ती बारावी पास असून गेल्या दोन महिन्यापासून ती कोल्हापूरात मामाकडे आली होती. राजारामपूरीतील जिनी अॅन्ड जॉनी या कापड दूकानात कामाला आहे. गेल्या तीन दिवसापासून कामावर जातो म्हणून बाहेर पडलेली ती घरी आलीच नव्हती. मामाने तिच्या गावी व नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता मिळून आली नाही. मंगळवारी ते राजारामपूरीत बेपत्ता वर्दी देणार होते, तो पर्यंत ती मिळून आली.