आठ दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:41+5:302021-02-05T07:16:41+5:30

कोल्हापूर : शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्राकडील एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीला आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या ...

Low pressure water supply to the city for eight days | आठ दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

आठ दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

Next

कोल्हापूर : शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्राकडील एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीला आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक भागात अपुरा तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे जलअभियंता नारायण भोसले यांनी एका पत्रकाद्वारे मंगळवारी दिली.

शिंगणापूर योजनेतील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर उपसा केंद्रातील ४३५ अश्वशक्तीच्या चार पंपांपैकी एक पंपाच्या ३३०० व्होल्ट व्हॅक्युम कॉन्टक्टर स्टार्टर ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे व स्पेअरपार्टस् खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

- या भागात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा -

ए, बी वॉर्ड - पुईखडी, जिवबानाना पार्क, क्रांतिसिंह पाटीलनगर, सानेगुरुजी, तुळजाभवानी मंदिर, क्रेशर चौक, राजोपाध्येनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, निकम पार्क, संभाजीनगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, हनुमाननगर, रेसकोर्स, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, हॉकी स्टेडियम, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, आर. के. नगर, बळवंतनगर.

ई वाॅर्ड- राजारामपुरी, शाहूमिल, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, शाहूनगर, महाडिकमाळ, माळी कॉलनी, टाकाळा, शिवाजी पार्क, मार्केटयार्ड, लोणार वसाहत, शाहूपुरी पहिली ते पाचवी गल्ली, पाच बंगला, लिशा हॉटेल परिसर.

Web Title: Low pressure water supply to the city for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.