सुर्वेनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:22+5:302021-04-01T04:24:22+5:30

कळंबा : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील वारंवार बंद पडणाऱ्या वीज मोटारीचा फटका गेला महिनाभर सुर्वेनगरातील नवनाथनगर, बापूरामनगर, दादू चौगुलेनगर, दत्तोबा ...

Low pressure water supply in Survenagar; Civil harassment | सुर्वेनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिक हैराण

सुर्वेनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिक हैराण

Next

कळंबा : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील वारंवार बंद पडणाऱ्या वीज मोटारीचा फटका गेला महिनाभर सुर्वेनगरातील नवनाथनगर, बापूरामनगर, दादू चौगुलेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क येथील रहिवाशांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने वैतागलेले नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्गतीकरण करणाऱ्या एकाच सहाइंची जलवाहिनीवर दोन बारा एच.पी. विद्युत मोटारी बसविण्यात आल्या आहेत. पाणी निर्गतीकरण करताना विद्युत मोटारीवर ताण पडून त्या वारंवार जळण्याच्या व बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी या भागात कमी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींवर संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेला महिनाभर या समस्येमुळे महिलावर्ग वैतागला असून यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Low pressure water supply in Survenagar; Civil harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.