साडे तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:31 AM2021-08-18T04:31:24+5:302021-08-18T04:31:24+5:30

कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ५५ तर त्याखालोखाल करवीर तालुक्यात २७ आणि हातकणंगले तालुक्यात २२ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

The lowest patient in three and a half months | साडे तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्ण

साडे तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्ण

Next

कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ५५ तर त्याखालोखाल करवीर तालुक्यात २७ आणि हातकणंगले तालुक्यात २२ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजरा आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या खाली आली असून, सध्या २ हजार ७८४ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ४४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चौकट

तालुकावार मृत्यू

आजरा ०२

भावेवाडी, हाजगोळी खुर्द

हातकणंगले ०२

यळगूड, पुलाची शिरोली

करवीर ०१

कळंबा

इचलकरंजी ०१

भुदरगड ०१

पळशिवणे

इतर जिल्हा ०१

विलासपूर कराड

चौकट -

महापालिका हद्दीत एकही मृत्यू नाही-

कोरोनामुळे जिल्ह्यात नऊ रुग्ण दगावले असले तरी कोल्हापूर शहरात गेल्या अनेक दिवसात प्रथमच कोणी दगावले नाही, हा एक मोठा दिलासा आहे. महानगरपालिका हद्दीतील रुग्ण संख्या देखिल झपाट्याने कमी होत आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याची शहरात आजही सक्ती होताना दिसते.

Web Title: The lowest patient in three and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.