एकरकमी ‘एफआरपी’ने किमान २५०० रूपये मिळणारच
By admin | Published: November 18, 2014 09:13 PM2014-11-18T21:13:16+5:302014-11-18T23:35:39+5:30
जिल्ह्यातील कारखान्यांचा १२.७५ ते १३.४० सरासरी साखर उतारा : बिद्री, कुंभी, गुरुदत्त, दालमिया, शाहू, भोगावती आघाडीवर
प्रकाश पाटील- कोपार्डे --कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शाहू व गुरुदत्त वगळता ऊसदराबाबत मौन पाळत हंगाम सुरू केले. मात्र, ऊसदर नियामक मंडळाच्या बैठकीत एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक आहे. जे एकरकमी एफआरपी देणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे घोषित केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना किमान २५०० रुपयांपर्यंत तरी एकरकमी मिळणार असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या सर्वच २१ साखर कारखान्यांचे हंगाम २०१३-१४ मधील साखर उतारे १२.५० ते १३.४० च्या दरम्यान आहेत. या सर्व साखर कारखान्यांची एकूण एफआरपी ३००० ते ३१५०च्या दरम्यान होते. यातून तोडणी वाहतूक खर्च ४५० वजा जाता किमान २४५० ते २६८० रुपये प्रतिटन एफआरपीप्रमाणे ऊसदर निघत आहे.
शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ मधील कलम ७(अ) प्रमाणे कारखान्यांनी गाळपासाठी ऊस
तोडून नेल्यानंतर किमान १४ दिवसांत त्या उसाची प्रतिटन एफआरपी शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे, असे न केल्याने एखाद्या शेतकऱ्याने याबाबत दाद मागितल्यास साखर आयुक्तालयाकडून त्याबाबत कारवाई करीत फौजदारी दाखल
होऊ शकते. मात्र, हा कायदा झाल्यानंतर आजपर्यंत या कायद्याखाली कोणत्याही कारखानदारांवर गुन्हा नोंद होऊन कारवाई झाल्याचे आजपर्यंत राज्यात एकही उदाहरण नाही.मात्र, केवळ आंदोलने, त्याचा गाळप हंगामावर होणारा परिणाम, यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संघटनांनी मवाळ भूमिका घेऊन कायद्याची लढाई लढण्यासाठी व्यूहरचना केली असून, त्याला आता ऊसदर नियामक मंडळाची साथ मिळणार आहे.ऊसदर नियामक मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे मुख्य सचिव क्षत्रिय स्वाधीन यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास त्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची घोषणाच केल्याने आता कारखानदारांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री, कुंभी, गुरुदत्त, शाहू, दालमिया, भोगावतीसह किमान १५ कारखान्यांचा सरासरी उतारा १२.५० ते १३.४० टक्के एवढा असल्याने किमान २५०० रुपये एफआरपीने ऊस उत्पादकांना मिळणार आहेत.
२०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ४५० रुपये तोडणी
व वाहतूक वजा जाता द्यावा लागणारा एफआरपीप्रमाणे ऊसदर
कारखान्याचे नावसरासरीएफआरपीप्रमाणे
साखर उताराद्यावा लागणारा दर
मंडलिक, हमीदवाडा१३.३८२६५०
कुंभी-कासारी, कुडित्रे१३.३३२६४०
बिद्री१३.३३२६४०
दत्त दालमिया१३.१५२६३०
भोगावती१३.०५२५८०
शाहू, कागल१३.०५२५८०
गुरूदत्त, टाकळी१३.२३२६३०
पंचगंगा, इचलकरंजी१३.००२५६२
शरद, नरंदे१३.१०२६०१
कारखान्याचे नावसरासरीएफआरपीप्रमाणे
साखर उताराद्यावा लागणारा दर
दत्त, शिरोळ१२.७५२५०४
वारणा१२.४७२५२५
जवाहर१२.५७२४४६
डी. वाय. पाटील, पळसंबे१२.४३२४४६
राजाराम, बावडा१२.४०२४४०
आजरा, गवसे१२.५१२४४६
गडहिंग्लज, हरळी१२.०३२३००
इको केन, नलवडे१३.२७२६४०
हेमरस१३.१२२५९५