खंडग्रास चंद्रग्रहणाची उद्या रात्री पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 08:15 PM2017-08-06T20:15:50+5:302017-08-06T20:17:04+5:30
कोल्हापूर : राज्यातील तमाम खगोलप्रेमींना उद्या, सोमवारी रात्री ११ पासून खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. कोल्हापुरातूनही जरी हे ग्रहण दिसणार असले तरी चंद्राचा फारच थोडा भाग पृथ्वीच्या छायेत येईल. रात्री १0 वाजुन ५0 मिनीटानी ग्रहणाला प्रारंभ होईल. मात्र ११ पासुन पुढे थोडी फार सावली दिसू लागणार आहे.अर्थात आकाशात ढग नसतील तरच पूर्ण ग्रहणाची मजा कोल्हापुरकर अनुभवी शकणार आहेत.
कोल्हापूर : राज्यातील तमाम खगोलप्रेमींना उद्या, सोमवारी रात्री ११ पासून खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. कोल्हापुरातूनही जरी हे ग्रहण दिसणार असले तरी चंद्राचा फारच थोडा भाग पृथ्वीच्या छायेत येईल. रात्री १0 वाजुन ५0 मिनीटानी ग्रहणाला प्रारंभ होईल. मात्र ११ पासुन पुढे थोडी फार सावली दिसू लागणार आहे.अर्थात आकाशात ढग नसतील तरच पूर्ण ग्रहणाची मजा कोल्हापुरकर अनुभव शकणार आहेत.
जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडते. ज्यावेळी पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा त्यास खग्रास चंद्रग्रहण म्हणतात तर जेव्हा चंद्राचा काही भाग झाकला जातो, तेव्हा त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात.
रात्र९ वाजून २0 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश करेल. इथून ग्रहणाचे वेध सुरु होतील. रात्री १0 वाजून ५२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल आणि ग्रहणाला सुरुवात होईल.
चंद्र हा सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या रेषेच्या किंचित वर चंद्र असल्याने पूर्ण चंद्रबिंब न झाकता पृथ्वीची सावली चंद्राच्या खालील भागावरुन पुढे सरकताना दिसेल. ही सावली डावीकडून उजवीकडे सरकेल. रात्री ११ वाजुन ५0 मिनिटानी ग्रहणाचा मध्य असणार आहे. यावेळी चंद्र्राच्या खालील बाजुचा साधारण २0 टक्के भाग पृथ्वीच्या छायेखाली येईल. तिथुन पुढे ही सावली हळू हळू उजवीकडे सरकेल आणि १२ वाजुन ४८ मिनीटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेतून बाहेर पडेल आणि मुख्य ग्रहण संपेल. रात्री २ वाजून २0 मिनिटांनी चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल आणि मोक्ष होईल.
हे ग्रहण महाराष्ट्रातून १ तास ५५ मिनिटे अनुभवता येणार आहे. अर्थात काळे ढग नसतील तरच. ग्रहण काळामध्ये चंद्रप्रकाशाची तेजस्विता 0.२५ असेल. भारतासहित हे ग्रहण आशिया, युरोप, आफ्रिया तसेच आॅस्ट्रेलिया येथूनही दिसू शकेल. यापुढील चंद्रग्रहण ३१ जानेवारी २0१८ आणि २७ जुलै २0१८ रोजी होणार आहे. दोन्ही खग्रास प्रकारचे ग्रहण आहेत.