म. ए. समितीतर्फे शुभम शेळके यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:15 AM2021-03-30T04:15:43+5:302021-03-30T04:15:43+5:30
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शेळके म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. तथापि जे कोणी ही निवडणूक लढवू इच्छितात, त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे आलो आहोत.
मराठी भाषिक लोकांची गळचेपी आणि एकजूट या माध्यमातून आम्ही ही पोटनिवडणूक लढविणार आहोत. विकासाला समितीने कधीही विरोध केला नाही. त्याचप्रमाणे आजवर बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. त्यामुळे बेळगावचा आजवर जो विकास झाला आहे, तो म. ए. समितीच्या माध्यमातून झाला आहे आणि भविष्यातही त्या अनुषंगानेच आम्ही काम करणार आहोत.