यंत्रमागधारकांनी कामगारांची आरटीपीसीआर, अॅँटिजन चाचणी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:43+5:302021-05-28T04:19:43+5:30
इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना, सायझिंग असोसिएशन, लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी ...
इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना, सायझिंग असोसिएशन, लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांची बैठक पार पडली.
बैठकीत शहर व परिसरातील यंत्रमागधारकांनी येत्या सात दिवसांत कामगारांची आरटीपीसीआर अथवा अॅँटिजन चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे. दिलेल्या मुदतीत जे यंत्रमागधारक आपल्या कामगारांची चाचणी करून घेणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रमागधारकांनी आपल्या कामगारांची अॅँटिजन चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना कामगारांना देण्यात याव्यात. तसेच आपल्यावर होणारी करवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, विनय महाजन, राजगोंडा पाटील, अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यासह संघटना व असोसिएशनचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.